आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US कडे जगातील सर्वात महागडी युद्धनौका, 220 विमाने रोज करू शकतात उड्डाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेची सर्वात महागडी आणि अल्ट्रा मॉडर्न वॉरशिप 'यूएसएस गेराल्ड आर फोर्ड'... - Divya Marathi
अमेरिकेची सर्वात महागडी आणि अल्ट्रा मॉडर्न वॉरशिप 'यूएसएस गेराल्ड आर फोर्ड'...
न्यूपोर्ट- अमेरिकेने आपली सर्वात महागडी आणि अल्ट्रा मॉडर्न वॉरशिप 'यूएसएस गेराल्ड आर फोर्ड' लॉन्च केली आहे. याची किंमत सुमारे 83,928 कोटी रुपये (13 अब्ज डॉलर) सांगितली जात आहे. याचा फ्लाईट डेकचा आकार 5 एकर आहे, ज्यावर एका वेळी 75 एयरक्राफ्ट उभे राहू शकतात. युद्धाच्या वेळी रोज 220 विमाने उड्डाण करू शकतात. याची सिस्टिम लेजर किरणांनी अपग्रेड केली जाऊ शकते. गेराल्ड आर फोर्ड अमेरिकेचे निमित्ज-क्लास करियरला रिप्लेस करेल. जो 51 वर्षाच्या सेवेनंतर 2012 मध्ये रिटायर करण्यात आली आहे.
 
दोन वर्षाच्या उशिरामुळे 16 हजार कोटींचे नुकसान-
 
गेराल्ड आर फोर्डटी लॉन्चिंग 2015 मध्ये होणे अपेक्षित होते. त्यावेळी त्याचे बजेट 67,788 कोटी रूपये इतके होते. पण लॉन्चिंगला दोन वर्षाचा उशिर झाला. त्यामुळे त्यात आणखी 16 हजार कोटी रुपयाची वाढ झाली. अमेरिकेकडे अशा तीन युद्धनौका तयार होत आहे. बाकी दोनमधील एक युद्धनौका 2020 आणि तर दुसरी 2025 मध्ये लॉन्च होईल. तीन युद्धनौकांसाठी एकून खर्च 2.78 लाख कोटी रूपये रूपये (43 अब्ज डॉलर) अपेक्षित आहे. 
 
400 स्टेच्यू ऑफ लिबर्टीच्या वजनाबरोबर-
 
1 लाख टन इतके या युद्धनौकाचे एकून वजन. 1 स्टेच्यू ऑफ लिबर्टीचे वजन आहे 225 टन. 
1 कोटी फूट वायरचा वापर केला आहे. पृथ्वीपासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून 10 पट दूर आहे.  
1106 फुट लांब आहे ही युद्धनौका. सुमारे 256 फूट रूंद आणि 250 फूट ऊंच आहे.  
4,660 कर्मचारी एकाच वेळी तेथे राहू शकतात. याशिवाय 75 क्रू मेंबर त्यांच्यासोबत कायम राहतील.  
15,000 लोकांचे रोज जेवण बनविले जाऊ शकते या युद्धनौकेवर. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या वॉरशिपचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...