आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात जगातील पहिले ग्रीन हाऊस, समुद्राच्या पाण्यावर होतेय शेती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियातील पोर्ट ऑगस्टा सिटीतील वाळवंटात जगातील पहिला ग्रीन हाउस उभारले गेले आहे. - Divya Marathi
ऑस्ट्रेलियातील पोर्ट ऑगस्टा सिटीतील वाळवंटात जगातील पहिला ग्रीन हाउस उभारले गेले आहे.
सिडनी- ऑस्ट्रेलियातील पोर्ट ऑगस्टा सिटीतील वाळवंटात जगातील असा पहिले ग्रीन हाउस उभारले गेले आहे जेथे समुद्राच्या पाण्याने आणि सौर ऊर्जेच्यामदतीने भाज्या उगवत आहेत. समुद्रातील खारे पाणी सौर ऊर्जामुळे शेतीलायक बनवले गेले आहे. 1338 कोटी रुपयाचे ग्रीन हाउस...
- हे ग्रीन हाउस 50 एकरात पसरले आहे. या उभे करण्यासाठी 1338 कोटी रूपये खर्च आला आहे.
- येथे दरवर्षी 17 हजार टन भाज्या उत्पादित केल्या जाऊ शकतात. या ग्रीन हाऊसचेसीईओ फिलिप सॉमवेबर म्हणाले, ‘जगात प्रथमच अशा प्रकारची अॅग्रीकल्चरलची ही सिस्टम आहे ज्यात जीवाश्म ईंधन, भूजल, किटनाशकांचा उपयोग केला गेलेला नाही. हे पूर्णपणे ऑर्गेनिक फॉर्महाउस आहे.’
- आता येथे टोमॅटोचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. या हंगामात 17 हजार टनाचे उत्पादन केले जाईल.
1 दिवसात 39 मेगावॅट वीज-
- फार्महाउसला 23 हजार सोलर प्लेट लावल्या गेल्या आहेत. यात दिवसाला 39 मेगावॅट वीज उत्पादित होते.
- एवढी वीज खा-या पाण्याला गोडे करण्यासाठी आणि ग्रीनहाऊसला गरम ठेवण्यासाठी पुरेशी आहे.
2 किमी दूरवरून आणले समुद्राचे पाणी....
- या ग्रीनहाउससाठी तेथील स्पेन्सर खाडातून 2 किमी लांबीवरून पाईपलाईन टाकून समुद्रातील पाणी आणले आहे.
- वाळवंटात तापमान जास्त असल्या कारणाने येथील लहान रोपे वाचविण्यासाठी त्याच्या आसपास पाण्यात बुडवलेले कार्डबोर्ड ठेवले जातात.
- जमिन तापल्याने रोपे जळून जातात त्यामुळे येथील जमिनीऐवजी नारळाच्या भुश्यात ही रोपे लावली जातात.
- या प्रोजेक्टची सुरुवात 2010 मध्ये झाली. ओमान, कतार आणि यूएईमध्येही असे अनेक प्रोजेक्ट्सवर काम सुरु आहे.
- तर पोर्तूगाल आणि अमेरिका येथेही अशा प्रकारचे ग्रीनहाऊस उभारण्याची तयारी सुरु आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, वाळवंटातील ग्रीन हाउसचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...