आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा \'हॉट योगा\' शिकवतो हा योग गुरु, वर्षातून एकदाच करतो अंघोळ ते ही समुद्रात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका तरूणीला योगा शिकवताना स्टीवर्ट गिलक्रिस्ट - Divya Marathi
एका तरूणीला योगा शिकवताना स्टीवर्ट गिलक्रिस्ट
इंटरनॅशनल डेस्क- भारतीय वंशाचा अमेरिकन नागरिक आणि हॉट योगा गुरु विक्रम चौधरीला आपली पूर्वाश्रमीची वकील मीनाक्षी जाफा बोडेन हिला सुमारे 6 कोटी 27 लाख रुपये दंड देणे आहे. मात्र, विक्रम अमेरिका सोडून पसार झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाला चांगलेच वळण मिळाले आहे. विक्रम फरार झाल्याने कोर्टाने मीनाक्षीच आता  ‘विक्रम योग स्टूडियोज’ च्या 700 फ्रेंचायजीची मालकीन असेल असे जाहीर केले आहे. कोलकात्यातील एका गल्लीतून अमेरिकेत जात योगाद्वारे विक्रमने आपले साम्राज्य पसरवले. 
 
ब्रिटनमध्ये तो आपल्या स्टूडंटला ट्रेन करण्यासाठी 13,500 पाउंड (सुमारे 11 लाख रुपये) घ्यायचा, अमेरिकेत तो 10 ते २० हजार डॉलर घ्यायचा. जसा जसा विक्रमचा बिजनेस वाढत गेला तसा त्याचा व्यवहार आणि नियतही बदलत गेली. तो योग गुरू नाही तर बिजनेसमॅन बनला होता. दारू आणि सेक्स त्याच्या आयुष्याचा भाग बनला. विक्रमने सुमारे 5000 महिलांसोबत संबंध बनवले होते त्यावरून तो किती सेक्सच्या आहारी गेला होता हे स्पष्ट होते. त्याचा योगा हॉट योगा म्हणून प्रसिद्ध आहे. आता विक्रमच्या हॉट योगाच्या प्रयोगानंतर मार्केटमध्ये अनेक योग गुरु आले आहेत. अशाच एका विचित्र हॉट योगगुरुबाबत आज आपण वाचणार आहोत....
 
असा 'हॉट योगा' शिकवतो हा योग गुरु-
 
- जगभरात विविध भागांत अनेक योग गुरु आहेत. जे लोकांना योगाचे महत्व पटवून देतात. सोबतच ते लोकांना योगासुद्धा शिकवतात.
- त्यातील अनेक योग गुरु न्यूड योगा करतात, तर कोणी सामान्य योगा. असाच एक योग गुरु ब्रिटनमध्ये राहतो. 
- त्याचे नाव स्टीवर्ट गिलक्रिस्ट आहे. हा योग गुरु 'हॉट योगा' शिकवतो. 
- 53 वर्षांच्या स्टीवर्टचे एक योगा क्लास आहे, जो 'टचिएस्ट-फीलिएस्ट' नावाने प्रसिध्द आहे. 
- येथे लोकांकडून 90 मिनिटांचे योगासन करून घेतले जाते. 
- ब्रिटनच्या प्रिन्सचे नातेवाईक पिप्पा मिडलटन यांच्या संदर्भात स्टीवर्ट सांगतो, की जेव्हा ते कॅमडेन हाय स्ट्रीटवर भेटले तेव्हा मी त्यांना ओळखूच शकलो नाही. नंतर त्यांनी स्टीवर्टचे हॉट योगा क्लास जॉइन केला. 
 
वर्षातून एकदाच करतो अंघोळ-
 
- स्टीवर्ट म्हणतो, की तो वर्षातून एकदाच अंघोळ करतो. तेसुध्दा समुद्रात. यादरम्यान एक महिना त्याच्या शरीराचा दुर्गंध येत नाही. 
- तो सांगतो, की अंगाचा दुर्गंध येत असला तरी लोकांना त्यातून काहीतरी आकर्षण निर्माण होते. त्याकडे प्रभावित होऊन लोक त्याच्या योगा शिकण्यासाठी येतात. 
- स्टीवर्ट कधीच केस कापत नाही. मला चाकू आणि कात्रीशिवाय आयुष्य कसे असते, हे मला जाणून घ्यायचे आहे. 

कलाकारांपासून प्रिन्सच्या नातेवाईकांपर्यंत सर्वांना शिकवतो योगा...
 
- स्टीवर्टकडे प्रसिध्द लोकसुद्धा योगा शिकण्यासाठी येतात. त्यात ब्रिटनच्या प्रिन्सचे नातेवाईक पिप्पा मिडलटन, हॉलिवूड अभिनेता वुडी हारेलसन आणि केट मॉस यांच्यासह अनेक नावे सामील आहेत. 
-योग गुरु स्टीवर्ट गिलक्रिस्टला ब्रिटनमध्ये सर्वात टची-फीलि योगा टीचरच्या रुपात ओळखला जातो. त्याचे केस लांब आहे. त्याच्या केसातून दुर्गंधीसुध्दा येते, तरीदेखील लोक त्याच्याकडे हॉट योगा शिकण्यासाठी येतात. 
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, हॉट योगा शिकवणा-या योग गुरुचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...