आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : १०० दिवस १०० विद्यापीठांत योग, भारतीय प्राचीन परंपरेचा सन्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - येथे एक प्राचीन भारतीय परंपरा असलेले योगाची ओळख करुन देण्यासाठी चीनने उघडली एक विशेष मोहीम. चीनमधील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नैराश्य व ताणतणावाच्या स्थितितून बाहेर आणून त्यांना कार्यक्षण उर्जावान उत्साही बनविण्यासाठी चीनमधील १०० विद्यापीठात योगपरंपरेची ओळख करुन देण्याची मोहीम उघडली आहे. ही मोहीम १०० दिवस १०० विद्यापीठ या नावाने असून,ती विद्यार्थ्यांमधील नैराश्याशी लढणे शिकावे यासाठी आहे.
या मोहीमेचे लॉन्चिंग व संचालन चीनचे प्रसिध्द योगी योगा ही संस्था करणार आहे. ही संस्था पेकिंग विद्यापीठाच्या मदतीने हा महत्वकांक्षी उपक्रम राबवित आहे आणि ही प्रसिध्द संस्था माजी फॅशन पत्रकार आणि तिचा भारतीय पती आणि अनेक योगा शिक्षक चालवित आहेत. से नो डिप्रेशन विथ योगा हा उपक्रम कालच पेकिंग विद्यापीठाच्या आवारात सुरु झाला. यात पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

हे १०० दिवस १०० विद्यापीठ कॅम्पेन प्रामुख्याने प्राणायाम, मेडीटेशन आणि विशेष योगा आसने शिकविण्यासाठी आहे. योगी -योगाचे संस्थापक आणि सीईओ यिन यान हे पीटीआयशी बोलतांना म्हणाल्या की, त्यांचे पती मोहन सिंग भंडारी यांनी कॅम्पेनचे उद् घाटन विशेष तयार केलेल्या योगारचनेने केले.

कोण आहेत या यिन यान
या चीनमधील इलाईट इंटरनॅशनल फॅशन मॅगझिन भाषिक आवृत्तीच्या मोहन यांच्यासह माजी संपादीका राहीलेल्या आहेत. नंतर त्यांनी मोहन यांच्याशी ऋषिकेश येथे विवाह केला. आणि योगा योगी या प्रसिध्द योग संस्थेची चीनमध्ये २००३ मध्ये स्थापना केली. ज्यामुळे पारंपारीक अध्यात्मिक भारतीय योग कला व्यावसायिकरित्या देखील यशस्वी केली. या संस्थेची संपूर्ण चीनमध्ये २०,००० वर शाखा आहेत. याची वार्षिक उलाढाल १० दशलक्ष यूएसडी एव्हढी आहे.
बातम्या आणखी आहेत...