आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 17 People\'s Died In Huge Blast In Chinese Port City

PHOTOS : चीनमध्ये ब्लास्ट, 17 ठार, शक्तिशाली भूकंपाप्रमाणे हादरली जमीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सकाळपर्यंतही ही आग आटोक्यात आली नव्हती. - Divya Marathi
गुरुवारी सकाळपर्यंतही ही आग आटोक्यात आली नव्हती.
शांघाय - उत्तर-पूर्व चीनच्या पोर्ट सिटी तियानजिनच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये बुधवारी रात्री उशीरा झालेल्या दोन मोठ्या स्फोटांमध्ये जवळपास 17 जण ठार झाले आहेत. तर 400 पेक्षा अधिक जखमी असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये फायर ब्रिगेडच्या चार कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. प्रेसिडेंट शी जिंगपिंग यांनी पीडितांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहे.

स्फोटकांमुळे घडली घटना
चीनचा सरकारी टिव्ही सीसीटीवी आणि शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पहिला स्फोट स्थानिक वेळेनुसार रात्री उशीरा 11.30 वाजता स्फोटकांच्यामुळे झाला. त्यानंतर काही सेकंदांमध्येच लगेचच दुसरा स्फोटही झाला. मात्र या स्फोटकांना आग कशी लागली याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.

अनेक इमारतींचे नुकसान
स्फोटामुळे अनेक किलोमीटर अंतरापर्यंत धक्के जाणवले. सोशल मीडियावर व्हारल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये ढगांमध्ये मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट दिसून येत होते. त्याचबरोबर अनेक इमारतींचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 100 पेक्षा अधिक गाड्या पोहोचल्या. या शक्तीशाली इस आजुबाजूच्या परिसरातील घरांची दारे आणि आरसे, काचा फुटल्या. काही भागांमध्ये वीजही गुल झाली होती.

प्रत्यक्षदर्शींचे मत
>मिस यांग नावाच्या स्थानिक महिलेने सांगितले की, ती शॉपिंगसाठी निघाली होती. त्याचवेळी तिला मागे एक मोठा आगीचा गोळा दिसला. तसेच एक मोठा स्फोटही झाला. स्फोटाच्या वेळी जवळपासची जमीन, कार आणि इमारतीदेखिल हादरल्या. इमारतींच्या काचा फुटल्या आणि लोकांचीही पळापळ झाली.
>कॅनाडाची शिक्षिका मोनिका अँड्रयूजने सांगितले की, मोठ्या धमाक्याचा आवाज होताच ती अगदी घाबरून उठली होती. जणू भूकंप आल्यासारखेच त्यांना वाटले. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले तर आकाश पूर्णपणे लाल झाले होते. त्यानंतर लगेचच दुसरा स्फोटही झाला. प्रत्येक जण घरातून बाहेर पळत होता. सगळ्यांना भूकंप आल्यासारखेच वाटत होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित Photos...