आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये एक भारतीय नागरिकासह 20 पर्यंटकांना अटक, दहशतवाद्यांंशी संबंध?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून उत्तर चीनमध्ये 20 पर्यटकांना पोलिसांनी अटक करण्यात आले आहे. यात ब्रिटिश, दक्षिण आफ्रिकेतील पर्यटकांसह एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. ब्रिटनमधील परराष्ट्र विभाग आणि दक्षिण आफ्रिकेतील एका चॅरिटी ग्रुपने या घटनेला दुजोरा दिला आहे.

ब्रिटनच्या परराष्ट्र विभागानुसार, दहशतवाद्यांची संबंध असल्याच्या संशयावरून पर्यटकांना चीन पोलिस अटक केले आहे. सर्व पर्यटक एका हॉटेलमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रचार करणारा व्हिडिओ पाहात होते. सगळ्यांची कसून चौकशी घेतली जात आहे.

20 पैकी 11 जणांची सुटका होणार
पर्यटकांच्या सुटकेसाठी दक्षिण आफ्रिकेतील सामाजिक संघटना 'गिफ्ट ऑफ द गिवर्स' फाउंडेशन प्रयत्न करत आहे. चीनी प्रशासनसोबत चर्चा झाल्यानंतर 20 पैकी 11 पर्यटकांची सुटका करण्‍याची तयारी दर्शवली आहे. 17 जुलैला 11 पर्यटकांची सुटका करण्यात येणार आहे. मात्र, नऊ पर्यटकांना मंगोलियामधील एका डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. यात दक्षिण आफ्रिकेतील पाच, ब्रिटनमधील तीन आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. पर्यटकांच्या मदतीसाठी काउंसलर स्टाफ चीनमध्ये पाठवण्यात आल्याचे ब्रिटनच्या परराष्‍ट्र विभागाने सांगितले आहे.

47 दिवसांच्या ट्रिपवर ग्रुप
मिळालेल्या माहितीनुसार, 47 दिवसांच्या ट्रिपवर असलेल्या 20 पर्यटकांच्या या ग्रुपला मंगोलियामधील इरडोस शहरातील एजिन होरो एअरपोर्टवर अटक करण्‍यात आले.