आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: गेल्या वर्षी आजच्या दिवशी जपानमध्ये झाला होता शक्तीशाली भूकंप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- जपानमध्ये गेल्या वर्षी आजच्याच दिवशी (14 एप्रिल) दक्षिण जपानमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता 7.3 इतकी होती. या भूकंपात शेकडो बळी गेले होते तर कित्येक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे पुढे आले होते.
 
त्याआधीही एक-दोन दिवस विविध ठिकाणी भूकंप झाले होते. मात्र त्याची तीव्रता कमी होती. मात्र त्यातही काही लोकांचा मृत्यू झाला होता तर, हजारो लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू कुमामोतोजवळ कियुसी बेटावर जमिनीत 10 किमी खोल होता. तेथे सर्वाधिक हानी झाली होती. येथील एकाच भागातील जवळपास हजार लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. कुमामोतोच्या गावांचा संपर्क तुटला होता. तसेच मिनामी आसोमध्ये तोकाई विद्यापीठातील वसतिगृहाची इमारत पडली होती. 
 
भूकंपातून निर्माण झालेल्या हजारो टन मातीचे थर घर, रस्ते आणि रेल्वे रुळावर साचले होते. रस्त्यांना जागोजागी तडे गेले होते. भूकंप इतका तीव्र होता की, बचाव पथकाचे कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना ठिकठिकाणी बाहेर काढताना दिसत होते.  बचाव पथकांनी सुमारे लाखहून अधिक लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले होते. जपान भूकंपप्रवण प्रदेशात येत असल्यामुळे येथे भूकंपाच्या घटना सामान्य आहेत. मात्र, गेल्या वर्षी आलेल्या या भूकंपाने जपानचे जीवितहानीसह मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
 
पुढील स्लाईडवर वाचा, तब्बल 6 तास ढिगार्‍याखाली होती चिमुरडी...
बातम्या आणखी आहेत...