शिक्षकाकडून मुलांना मारहाण केल्याचे आपण अनेकदा ऐकतो. पण सध्या चीनमध्ये असे एक प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. ही घटना जून महिन्यातील आहे. पण CCTV कॅमेऱ्यातील फूटेज तपासल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चिमुरड्याला मारहाण करण्यात आली आणि त्याला खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्यामुळे बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला होता.
हे बाळ कोण आणि कोणत्या शाळेतील आहे हे अद्याप समजलेले नसले तरी फुटेज समोर आल्यानंतर या बाबत सोशल मिडियावर चांगलीच टीका होत आहे. चीनमध्ये हे फुटेज चांगलेच व्हायरल होत आहे. फुटेज समोर आल्यानंतर या शिक्षिकेला सस्पेंड करण्यात आले आहे.
व्हिडिओतील दृश्य...
मोबाईलवर बोलणाऱ्या या शिक्षिकेने आधी या 3 वर्षांच्या चिमुरड्याला लाथ मारली. त्यानंतर जेव्हा त्या बाळाने खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुन्हा त्याला उचलून जमिनीवर आपटण्यात आले. या शिक्षिकेचा राग एवढ्यावरच शांत झाला नाही. तिने मुलाला एकट्याला खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर भीतीपोटी या मुलाने तिसऱ्या मजल्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो खाली पडला. या मुलाला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले. सध्या हे बाळ उपचार घेत आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये शूट झाली.
शिक्षिका सस्पेंड
फुटेजमधून झालेल्या खुलाशानंतर या शिक्षिकेला सस्पेंड करण्यात आले आहे. पण तिने या मुलाबरोबर अशी वर्तणूक का केली याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे शाळेच्या वतीने या बाळाच्या पालकांची माफी मागून त्याची संपूर्ण काळजी घेतली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा वरील स्लाइडवर...
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS