आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये ६.७ तीव्रतेचा भूकंप; एकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग : चीनच्या दक्षिण शिनझियांग प्रांतात शुक्रवारी रात्री भूकंपाचे झटके बसले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.७ एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाने एक घर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. त्यासोबतच इतर सहा घरांचीही पडझड झाली.
भूकंपाचे केंद्र १० किलोमीटर भूगर्भात व थंड उंचीच्या प्रदेशात होते. या प्रदेशात लोकसंख्या खूपच कमी अाहे. भूकंपाच्या केंद्राजवळील एका गावातील ८० घरांची पडझड झाली आहे. त्याच परिसरात काही मृत प्राणीही आढळून आले. दक्षिण शिनझियांगमध्ये रेल्वे सेवेला तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे. अमेरिकेच्या भूगर्भ अभ्यास विभागाने
भूकंपाची तीव्रता ६.५ एवढी नोंदल्याचे म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षांत येथील २०० किलोमीटरच्या परिघात चार किंवा त्याहून जास्त तीव्रतेचे ८३ भूकंप झाले आहेत. देशातील काही प्रदेशात भूकंपाच्या धक्क्याने हादरे बसले आहेत. त्यामुळे
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी घाबरू नये. भूकंपाच्या धक्क्यानंतर तत्काळ सुरक्षित ठिकाणी पोहचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...