आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहावीतल्या विद्यार्थिनी घेतली 15 व्या मजल्यावरून उडी, अशी वाचली...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनमध्ये एका शालेय विद्यार्थिनीने चक्क 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने हा टोकाचा निर्णय मानसिक तणावात येऊन घेतल्याचे तिच्या आईने सांगितले. विशेष म्हणजे, चक्क 15 व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतरही ती जिवंत आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे तिच्यावर इतका दबाव आला आणि ती कशी जिवंत वाचली याची माहिती चीनच्या माध्यमांनी दिली आहे. 

 

होम वर्क अपुरे असल्याचे टेन्शन
इयत्ता 6 वीत शिकणारी चिमुकली शाळेतून परतली तेव्हापासूनच तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते असे आईने सांगितले. संध्याकाळी तिने कुणालाही व्यवस्थित बोलले नाही. तिचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नव्हता. आता उद्या वर्गात जाऊन शिक्षकाला काय सांगणार याची धास्ती तिने घेतली होती. त्याच तणावात तिने हा टोकाचा निर्णय घेतला. शाळेत नेहमीच होणाऱ्या शिस्तीच्या कारवायांमुळे तिच्या मनावर वाइट परिणाम झाला होता असेही तिच्या आईने सांगितले आहे.

 

अशी वाचली...
चिनी माध्यमांनी सांगितल्याप्रमाणे, ती 15 व्या मजल्यावर असलेल्या खिडकीवर दोन्ही पाय बाहेर लटकवत ती बसली होती. शेजाऱ्यांनी तिच्या घरी सांगितले तेव्हा तिच्या खोलीतील दार आतून बंद होते. शेजाऱ्यांना हा प्रकार कळताच गर्दी झाली. काहींनी फायर ब्रिगेडला घटनास्थळी बोलावले आणि त्यांनी वेळीच दाखल होऊन खाली मोठे एअरबॅग टाकले. सुदैवाने, ती विद्यार्थिनी एअरबॅगवर पडली आणि तिला फक्त काही किरकोळ जखमा आल्या आहेत. तिचे फोटो आणि व्हिडिओ चीनमध्ये व्हायरल होत आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनास्थळाचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...