आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर कोरियात भीषण बस अपघात, 32 चिनी नागरिकांसह 36 जणांचा जागीच मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

प्योंगयंग - उत्तर कोरियात झालेल्या भीषण बस अपघातात किमान 36 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी तब्बल 32 जण हे चिनी नागरिक होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू काँग यांनी सांगितल्याप्रमाणे, उत्तर कोरियाच्या ह्वांगे प्रांतात रविवारी रात्री उशीरा हा अपघात घडला. खराब हवामान आणि रस्त्यांचे बांधकाम ही अपघाताची प्रमुख कारणे असू शकतात असा अंदाज स्थानिक माध्यमांनी लावला आहे.

 

- चीनच्या परराष्ट्र मंत्रलयाच्या प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, अपघाताच्या कारणाचा अजुनही पत्ता लागलेला नाही. तसेच बसच्या ढिगाराखाली आणखी काही नागरिक दबले होते. त्यांनाही बाहेर काढण्यात आले आहे. 
- या भीषण अपघातात एकूणच 36 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 32 जण चिनी नागरिक आणि 4 कोरियन नागरिक होते. सोबतच इतर अनेक जण जखमी सुद्धा झाले. 
- चीनच्या एका सरकारी माध्यमाने बस अपघाताचा एक व्हिडिओ ट्वीट सुद्धा जारी केला. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही बस एका ब्रिजवरून कोसळली. पण, काही मिनिटांतच तो ट्वीट डिलीट केला. 
- एकमेव मित्र राष्ट्र चिनी नागरिकांसाठी उत्तर कोरिया एक टूरिस्ट स्पॉट आहे. दरवर्षी चीनमधून या देशात 1 लाख पर्यटक येतात. तर इतर देशांमधून येणाऱ्या पर्यटकांचा आकडा फक्त 5 ते 6 हजार आहे. 

बातम्या आणखी आहेत...