Home | International | China | China Says India Should Have Learnt Lessons From Dokalam Stand Off

डोकलाममध्ये आम्ही जे केले तो आमचा हक्क होता; भारताने यापासून धडा घ्यावा: चीन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 26, 2018, 07:10 PM IST

डोकलाम क्षेत्रात तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात तिथे चीनने स्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे डोकलामचा वाद निर्माण झाला

 • China Says India Should Have Learnt Lessons From Dokalam Stand Off
  डोकलाम क्षेत्रात भारत आणि चीनचे सैन्य 73 दिवस एकमेकांसमोर ठाकले होते. (संग्रहित फोटो)

  बीजिंग- डोकलाम क्षेत्रात तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात तिथे चीनने स्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे डोकलामचा वाद निर्माण झाला असे वक्तव्य चीनमधील भारतीय राजदूत गौतम बंबावाले यांनी केले होते. त्याला चीनने उत्तर दिले आहे. डोकलाम आमचाच भूभाग आहे हे भारताने लक्षात घ्यावे. मागच्यावर्षी डोकलामवरुन संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. त्यातून भारताने धडा घ्यावा असे चीनने म्हटले आहे.

  बंबावाले काय म्हणाले होते, च्युनयिंग यांनी काय उत्तर दिले

  जुन्या ऐतिहासिक करारांनुसार डोकलाम आमचाच भूभाग आहे. आमच्या सार्वभौम अधिकारातंर्गत आम्ही तिथे हालचाली करत आहोत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ह्युआ च्युनयिंग यांनी बिजींगमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. मागच्यावर्षी प्रयत्न करुन आम्ही या विषयावर तोडगा काढला. मागच्यावर्षी जे काही घडले त्यातून भारत धडा घ्यावा आणि सीमेवर विकासासाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी चीनसोबत काम करावे असे च्युनयिंग यांनी म्हटले आहे. बंबावाले यांनी डोकलाममधल्या परिस्थितीसाठी चीनला जबाबदार धरले होते. चीनने तिथे स्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे संघर्ष उदभवला असे बंबावाले म्हणाले होते.

  पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 • China Says India Should Have Learnt Lessons From Dokalam Stand Off
  चीनमधील भारतीय राजदूत गौतम बंबावाले यांच्या वक्तव्यावर चीनच्या परराष्ट्राचे प्रवक्त्या ह्युआ च्युनयिंग यांनी उत्तर दिले आहे. (संग्रहित फोटो)

Trending