Home | International | China | China Sells Pakistan Sensitive Missile Technology

चीनने पाकिस्तानला दिली शक्तिशाली मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम; भारतासाठी धोक्याचा घंटा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 22, 2018, 07:29 PM IST

चीनने पाकिस्तानला शक्तिशाली मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम दिल्याची माहिती आहे. या सिस्टिममुळे पाकिस्तानच्या मल्टी वॉरहेड मिसाइ

 • China Sells Pakistan Sensitive Missile Technology
  चीनचे एक पथक तीन महिने याठिकाणी यंत्रणा बसविण्यासाठी होते. (संग्रहित फोटो)

  बीजिंग- चीनने पाकिस्तानला शक्तिशाली मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम दिली आहे. या सिस्टिममुळे पाकिस्तानच्या मल्टी वॉरहेड मिसाइल कार्यक्रमाला गती मिळणार आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वर्तमानपत्राने हे वृत्त दिले आहे. ही मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम पाकिस्तानला देणारा चीन हा एकमेव देश असावा, असा दावाही यात करण्यात आला आहे.

  कधी मिळाली पाकिस्तानला ही यंत्रणा?

  नवीन मिसाइल विकसित करण्यासाठी आणि विविध चाचण्यांसाठी पाकिस्तानने फायरिंग रेंजवर या मिसाइल सिस्टिमचा वापर सुरु केला आहे. चायनीस विज्ञान प्रबोधिनीच्या संशोधकाने वृत्तपत्राला ही माहिती दिली. पाकिस्तानने चीनकडून ही अत्याधुनिक मिसाइल प्रणाली विकत घेतली आहे असे सिचुआन प्रांतातील विज्ञान प्रबोधिनितील झेंग मेंग्वेई यांनी सांगितले.

  भारताने गुरुवारी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्यानंतर चीनने पाकिस्तानला ही मिसाइल सिस्टिम विकल्याची माहिती समोर आली आहे. साधारणत: मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिममध्ये दोन दुर्बीणी असतात चीनच्या या सिस्टिममध्ये चार दुर्बीणी आहेत. जास्त दुर्बीण असल्यामुळे एकाचवेळी वेगवेगळया दिशेने येणाऱ्या मिसाइलसवर लक्ष ठेवता येते. त्यामुळे शत्रूने डागलेल्या मिसाइलसकडून लक्ष्यभेद होण्याचा धोका कमी होतो.

  पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 • China Sells Pakistan Sensitive Missile Technology
  जास्त दुर्बीण असल्यामुळे एकाचवेळी वेगवेगळया दिशेने येणाऱ्या मिसाइलसवर पाकिस्तानला लक्ष ठेवता येणार आहे.

Trending