Home | International | China | China will warn India of water projects

जल प्रकल्पांबाबत चीन भारताला इशारा देणार; परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याची माहिती

वृत्तसंस्था | Update - Dec 27, 2017, 02:00 AM IST

चीनने ब्रह्मपुत्रेवर तिबेटमध्ये काही ठिकाणी कृत्रिम तलावांची बांधणी केली आहे. भविष्यात भूकंपानंतर पुरासारखी आपत्ती आेढवल

 • China will warn India of water projects

  बीजिंग- चीनने ब्रह्मपुत्रेवर तिबेटमध्ये काही ठिकाणी कृत्रिम तलावांची बांधणी केली आहे. भविष्यात भूकंपानंतर पुरासारखी आपत्ती आेढवल्यावर चीन भारताला त्याबाबत माहिती कळवणार आहे, असे चीनच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे.


  तिबेटमध्ये तीन कृत्रिम तलाव आहेत. तलावातील पाण्याची क्षमता अद्यापही निश्चित नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात भूकंपाच्या धक्क्यानंतर पूर आला होता. दरड कोसळल्यामुळे ही घटना घडली होती. तलावाचा स्फोट झाला किंवा आणखी काही दुर्घटना घडल्यास नदीच्या किनाऱ्यावरील लाखो लाेकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण हाेऊ शकतो. याबाबतची चिंता भारताने चीनला कळवली आहे. कारण अरुणाचल प्रदेश व आसाममधील जनजीवनाची त्यामुळे हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारचे संकट आेढवल्यानंतर आम्ही भारताला त्याबाबत अवगत करून देण्याचे काम करणार आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.


  दरम्यान, भारत-चीन यांच्यात सुमारे ३ हजार ४८८ किलोमीटर लांबीची वादग्रस्त सीमा आहे. भारताने अरुणाचल प्रदेशातील दक्षिण तिबेटवर अतिक्रमण केल्याचा कांगावा चीनने केला आहे. वास्तविक १९६२ च्या युद्धादरम्यान अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही चीनने भूमिका बदलली नाही.

  द्विपक्षीय चर्चेतून पेच सोडवण्याचा प्रयत्न
  भारत-चीन यांच्यात याच महिन्यात ब्रह्मपुत्रेवरील प्रकल्पाबाबत द्विपक्षीय चर्चा झाली होती. चर्चेची ही विसावी फेरी होती. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे अजित डोभाल व त्यांचे समकक्ष यांग जिएची यांच्या २२ डिसेंबर रोजी दिल्लीत यासंदर्भातील बैठक झाली होती. त्यात भारताने आपल्या चिंता मांडल्या होत्या.

Trending