Home | International | China | China's plan for Indo-Nepal-China Economic Project

भारत-नेपाळ-चीन आर्थिक प्रकल्पाची चीनची योजना

वृत्तसंस्था | Update - Apr 19, 2018, 03:23 AM IST

चीनने नेपाळला नैसर्गिकदृष्ट्या भारताशी सहकार्य जुळवणारे क्षेत्र असल्याचे सांगून भारत-नेपाळ-चीन आर्थिक प्रकल्पाचा प्रस्ता

  • China's plan for Indo-Nepal-China Economic Project
    बीजिंग -चीनने नेपाळला नैसर्गिकदृष्ट्या भारताशी सहकार्य जुळवणारे क्षेत्र असल्याचे सांगून भारत-नेपाळ-चीन आर्थिक प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यी यांनी नेपाळ-चीन आर्थिक प्रकल्पात भारताने सहभागी व्हावे यासाठी आमंत्रण दिले. नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ग्यावाली यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर यी यांनी हा प्रस्ताव मांडला.
    उभय देशांच्या परराष्ट्र मंत्रिस्तरीय बैठकीनंतर यी म्हणाले, चीन व नेपाळने हिमालयावर नेटवर्क उभे करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. खरे तर चीन, नेपाळ व भारत तिन्ही देश नैसर्गिक मित्र मानले पाहिजेत. तिन्ही देशांनी समान विकासाचे ध्येय ठेवले पाहिजे. चीन व नेपाळने पूर्वीच चीनच्या अनेक डॉलर्सच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाच्या (बीआरआय) करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामध्ये नेटवर्कसाठी सहकार्य वाढवण्यावर भर देण्याच्या मुद्द्याचाही समावेश आहे. अलीकडच्या निवडणुकीनंतर नेपाळमध्ये के. पी. शर्मा आेली सरकार स्थापन झाल्यानंतर ग्यावाली चीनच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान भारत-चीनमध्ये डोकलाम प्रकरणामुळे अनेक दिवस तणाव निर्माण झाला होता. नेेपाळशी भारताचे व्यापारसह इतर क्षेत्रातही चांगले संबंध राहिले आहेत.

Trending