आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने जिवंत माकडांचे बनवले डुप्लिकेट, असे खेळताना दिसून आले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - नानाविध कर्तबांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या चीनने आणखी एक कारनामा करून दाखवला आहे. आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे डुप्लिकेट बनवणाऱ्या या देशाने आता जिवंत माकडाचा डुप्लिकेट क्लोन तयार केला आहे. 20 वर्षांपूर्वी डॉली नावाच्या मेंढीचा क्लोन तयार करण्यात आला होता. त्याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोन माकडांचे क्लोन तयार करण्यात आले आहेत.  

 

बाटलीने पाजले जातेय दूध...
- माकडांचा जन्म शांघाय येथील चायनीझ अकॅडमी ऑफ सायंस (सीएएस) च्या इंस्टिट्यूट ऑफ न्यूरोसायंसमध्ये झाला आहे. 
- या दोन्ही माकडांची नावे झोंग-झोंग आणि हुआ-हुआ अशी ठेवण्यात आली आहे. झोंग 2 महिन्यांपूर्वी आणि हुआ दीड महिन्यापूर्वी जन्मला आहे.
- या दोघांनाही बाटलीने दूध पाजले जात आहे. तसेच यांची शारीरिक वाढ सामान्यरीत्या होत आहे असा दावा संशोधकांनी केला. 
- या माकडांचे क्लोनिंग बिगर भ्रूण कोशिका (नॉन एम्ब्रियॉनिक सेल) द्वारे कृत्रिम पद्धतीने करण्यात आली आहे. या प्रक्रियेला सोमॅटिक सेल न्यूक्लियर ट्रांसफर (SCNT) च्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे. 
- चायनीझ अकॅडमी ऑफ सायंस चे संशोधक ममिंग फू यांनी सांगितल्याप्रमाणे, हे कार्य मेडिकल रिसर्च क्षेत्रात खूप मदत करणार आहे. या प्रयोगाच्या मदतीने माकडांमध्ये होणाऱ्या आजारांवर अंकुश लावता येऊ शकेल. 
- यासोबत मानवी क्लोन तयार करणार अशी शक्यता या संशोधकांनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या माकडांचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...