Home | International | China | Chinese Space Lab Tiangong 1 Fall Crash On Earth News And Updates

चीनचे भरकटलेले अवकाश स्थानक ‘तियांगोंग-1’ आज पृथ्वीच्या कक्षेत

वृत्तसंस्था | Update - Apr 02, 2018, 05:27 AM IST

चीनचे भरकटलेले अवकाश स्थानक ‘तियांगोंग-१’ अतिशय वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असून सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास ते पृथ्

  • Chinese Space Lab Tiangong 1 Fall Crash On Earth News And Updates

    बीजिंग- चीनचे भरकटलेले अवकाश स्थानक ‘तियांगोंग-१’ अतिशय वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असून सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास ते पृथ्वीकक्षेत प्रवेश करेल. ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत कुठेही ते कोसळू शकते. चायना मॅन्ड् स्पेस इंजिनिरिंग ऑफिसने रविवारी ही माहिती दिली. पृथ्वीच्या कक्षेत हे स्थानक जळून नष्ट होईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होण्याची शक्यता फारच कमी आहे. आठ टन वजनाच्या या अवकाश स्थानकाने पृथ्वीकक्षेत प्रवेश केल्याने विमान वाहतुकीवर काहीही परिणाम होणार नाही. यापूर्वी पृथ्वीवर पडलेले स्कायलॅब आणि रशियाचे मीर हे अवकाश स्थानक अनुक्रमे ८० टन आणि १४० टन वजनाचे होते.

Trending