Home | International | China | Chinese Space LabChinese Space Lab Tiangong 1 Fall Crash Probably Near Mumbai News And Updates Tiangong 1 Fall Crash Probably Near Mumbai News And Updates

अंतराळातून मुंबईवर कोसळणार स्पेस स्टेशनचा ढिगारा? स्कूल बसच्या आकाराचा खंड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 01, 2018, 10:17 AM IST

काही खगोलशास्त्रांच्या मते, हा ढिगारा मुंबईच्या जवळपास कोसळू शकतो.

  • Chinese Space LabChinese Space Lab Tiangong 1 Fall Crash Probably Near Mumbai News And Updates Tiangong 1 Fall Crash Probably Near Mumbai News And Updates

    बीजिंग - चीनचे पहिले प्रोटोटाइप स्पेस लॅब तियांगोंग-1 सोमवारी पहाटेपर्यंत पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. काही खगोलशास्त्रांच्या मते, हा ढिगारा मुंबईच्या जवळपास कोसळू शकतो. यूरोपियन स्पेस एजेंसी एअरोस्पेस कॉर्पनुसार, तियांगोंग रविवारी आणि सोमवारच्या दरम्यान रात्री धरतीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. चीनची स्पेस एजंसी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (सीएनएसए) ने मे 2017 मध्येच ही घोषणा केली होती. मार्च 2016 पासून त्यांचे या स्पेस स्टेशनशी संपर्क तुटले.

    घाबरण्याचे कारण नाही...
    एका खासगी माध्यमाशी संवाद साधताना खगोलशास्त्रज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी ही शक्यता वर्तवली आहे. पण, हा कचरा मुंबईवरच किंवा जमीनीवरच पडेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. हा ढिगारा मुंबईच्या जवळपास समुद्रातही आदळू शकते असा दावा त्यांनी केला आहे. स्कूल बसच्या आकाराचे हे स्पेस स्टेशन तुकड्यांमध्ये कोसळणार आहे. त्यामुळे, याची तीव्रता तेवढी नसेल. सोबतच हे तुकडे कोसळताना त्यांच्या गुरुत्वाकर्षणाची तीव्रता कमी असणार आहे. त्यामुळे, जमीनीवर कोसळले तरीही तेवढे नुकसान होणार नाही असे सांगितले जात आहे. मुंबईच्या जवळपास त्याचा फक्त काहीसा भाग कोसळणार अशी शक्यता आहे.

  • Chinese Space LabChinese Space Lab Tiangong 1 Fall Crash Probably Near Mumbai News And Updates Tiangong 1 Fall Crash Probably Near Mumbai News And Updates

Trending