आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-चीन अधिकाऱ्यांची अण्वस्त्र प्रसारबंदीवर चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - भारत व चीनच्या अधिकाऱ्यांनी बीजिंगमध्ये अण्वस्त्र प्रसारबंदीच्या मुद्द्यावर चर्चा केली. चीनमध्ये भारतीय दूतावासाने याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चेसाठी स्थापन तंत्राच्या महत्त्वावर भर दिला.

 

यादरम्यान अण्वस्त्राच्या मुद्द्यावर बहुपक्षीय मंचांवर नि:शस्त्रीकरण व अण्वस्त्र प्रसारबंदीच्या दिशेने प्रगती झाली, आंतरराष्ट्रीय सुरक्षेत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या भूमिकेसह परस्पर हितांच्या विविध विषयांवरही चर्चा झाली. चीनच्या विरोधामुळे भारत अणुपुरवठादार गटात(एनएसजी) सहभागी होऊ शकत नाही. भारत यासंदर्भात चीनचा दृष्टिकोन बदलण्याचा सतत प्रयत्न करत आहे.  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या महिन्यात चीन दौऱ्यावर जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...