आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • चीनच्या काराओके लाउंजमध्ये आग लागून 18 ठार, 5 जखमी Fire In China Karaoke Lounge Kills People In Qingyuan City News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या काराओके लाउंजमध्ये आग लागून 18 ठार, 5 जखमी; पोलिसांना मुद्दामहून आग लावल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या ग्वांगदोंग प्रांतातील किंग्युआन शहरातील एका काराओके बारमध्ये आग लागून 18 जणांचा मृत्यू झाला आहे, दुसरीकडे 5 गंभीररीत्या जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात सोमवारी आणि मंगळवारदरम्यान रात्री झाला. पोलिस आणि फायरब्रिगेडने घटनेची माहिती मिळाल्यावर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांना संशय आहे की, जाणूनबुजून कुणीतरी हे अग्निकांड घडवले आहे.

 

पोलिसांनी सुरू केली घटनेची चौकशी 
- किंग्युआन सुरक्षा विभागाच्या प्राथमिक तपासात अपघातामागे आग लागल्याचे कारण समोर आले आहे. विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विबोवर यासंबंधित माहिती दिली. तथापि, पोलिस अधिकाऱ्यांनी ना घटनास्थळाची, ना चौकशीसंबंधित काही माहिती जाहीर केली.

 

चीनमध्ये नियमांत सूट असल्याने वाढताहेत आगीच्या घटना
- चीनमध्ये सुरक्षाविषयक नियम-कायद्यांत ढील असल्याने दरवर्षी आगीच्या अनेक घटना समोर येतात. 2015 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे एका नर्सिंग होममध्ये आग लागली होती. यात 38 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत 21 दोषींना कैदेची शिक्षा झाली.
- याशिवाय गतवर्षी राजधानी बीजिंगमध्ये आग लागल्याच्या 2 घटनांमध्ये तब्बल दोन डझन प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. यात एका घटनेत 19 जण जळून ठार झाले होते, यानंतर शहराच्या अधिकाऱ्यांनी असुरक्षित इमारतींची पडताळणी करून त्या पाडणे सुरू केले होते. 

बातम्या आणखी आहेत...