Home | International | China | Kim Jang, who gave the word for China to wrap up the nuclear program

अण्वस्त्र कार्यक्रम गुंडाळण्याचे किम जाेंग उन यांनी दिले चीनला वचन

वृत्तसंस्था | Update - Mar 29, 2018, 05:39 AM IST

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाेंग उन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील गुप्त बैठकीने आशियासह जगभरात खळबळ उडाल

 • Kim Jang, who gave the word for China to wrap up the nuclear program

  बीजिंग- उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाेंग उन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील गुप्त बैठकीने आशियासह जगभरात खळबळ उडाली होती. मात्र, या बैठकीत आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे गुंडाळण्याचे वचन उन यांनी मित्र राष्ट्र असलेल्या चीनला दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर उन यांनी हा दौरा आखला होता. दरम्यान, चीनने अमेरिकेला उन यांच्या दौऱ्याचा तपशील कळवला आहे.


  गेल्या दोन दिवसांपासून उन यांच्या गूढ दौऱ्याच्या चर्चेला उधाण आलेल्या असतानाच चीन व उत्तर कोरियाने उभय नेत्यांमधील भेटीच्या वृत्ताला दुजाेरा दिला. किम यांनी चीनमध्ये चार दिवस अनौपचारिक मुक्कामी होते, हे आता स्पष्ट झाले आहे. किम मायदेशी परतल्यानंतरच त्यांच्या दौऱ्याबद्दलची माहिती जाहीर करण्यात आली आहे, असे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी कबूल केले आहे. जपानच्या माध्यमांनी हिरवा रंगातील रेल्वे पाहिल्यानंतर किम यांच्या चीन मुक्कामाची कुणकुण लागली होती.


  कारण किम यांचे वडील अशाच प्रकारच्या रेल्वेतून चीनच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा चीनच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांचा हा दावा फेटाळला होता. परंतु चीन-उत्तर कोरियाच्या सीमेवर प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे किम यांच्या गोपनीय दौऱ्याचा अंदाज बांधण्यात आला होता.


  जपानला चिंता

  उन-जिनपिंग यांच्यातील चर्चा जपानच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंता वाढवणारी आहे, असे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी म्हटले आहे.

  ग्रेट हॉलमध्ये चर्चा, सपत्नीक नृत्यसंगीताची मेजवानी

  जिनपिंग यांनी किम यांचे या दौऱ्यात शाही स्वागत केले. ग्रेट हॉलमध्ये उभय नेत्यांत द्विपक्षीय चर्चा झाली. त्यात उन यांनी अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम बंद करण्याची हमी दिली. दोन्ही नेत्यांनी चीन-उत्तर कोरिया यांच्यातील ऐतिहासिक संबंधाला उजाळा दिला. किम यांनी जिनपिंग यांचे पुन्हा निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. किम यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रि सोल जूदेखील होत्या. किम यांनी सपत्नीक नृत्यसंगीताच्या कार्यक्रमाचा आस्वादही घेतला.

Trending