Home | International | China | #MeToo is growing in China despite government efforts to stop it

चीनमध्ये महिलांनी लैंगिक शोषणाविरोधात पुन्हा सुरू केले #MeToo कँपेन, आंदोलन दाबण्याचा सरकारचा प्रयत्न

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 28, 2018, 05:52 PM IST

चीनच्या सरकारने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. आतापर्यंत त्यांच्या शेकडो पोस्ट सेंसॉर करण्यात आल्या आहेत.

 • #MeToo is growing in China despite government efforts to stop it

  - 2017 मध्ये सर्वात आधी अमेरिकेमध्ये #MeToo कॅम्पेन सुरू झाले होते

  - जानेवारी 2018 मध्ये त्याचा परिणाम चीनच्या कॉलेजेसमध्ये दिसून आला

  हाँगकाँग - चीनमध्ये #MeToo अभियानाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. आठवडाभरात 10-12 महिलांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या. त्यात सामाजिक कार्यकर्ते आणि टिव्ही कलाकारांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला. पण चीनच्या सरकारने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. आतापर्यंत त्यांच्या शेकडो पोस्ट सेंसॉर करण्यात आल्या आहेत.


  #MeToo कॅम्पेनची सुरुवात 2017 मध्ये अमेरिकेतून झाली होती. त्यात अनेक पुरुषांना समाजासमोर मान खाली घालावी लागली होती. काहींना तर नोकरीही गमवावी लागली. चीनच्या कॉलेजेसमध्ये याचा परिणाम जानेवारी 2018 मध्ये पाहायला मिळाला. त्यावेळी अनेक महिलांनी विद्यापीठातील अधिकाऱ्यांना लैंगिक शोषणाचे आरोप लावले. त्यांतर सरकारने हे अभियान दाबले.


  शेकडो पोस्ट डिलिट
  चीनची न्यूज वेबसाइट साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार जानेवरी 2018 च्या दुसऱ्या आटवड्यात सेंसॉरने #MeToo कॅम्पेनशी संबंधित हजारो पोस्ट सोशल मीडियावरून डिलिट केले होते. त्यात प्रायमरी हॅशटॅग #MeTooInChina आणि अँटी-सेक्श्युअल हॅरशमेंटशी संबंधित पोस्टचाही समावेश होता. पण सेंसॉरलाही महिलांचा आवाज दाबता आला नाही.

Trending