आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी आणि जिनपिंग यांच्यासाठी वाजवले गेले हिट बॉलिवूड साँग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी येथे विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. - Divya Marathi
मोदींनी येथे विविध कार्यक्रमात सहभाग घेतला.

बीजिंग - नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते. यावेळी वुहान येथे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलिवूड गाण्याची धून वाजवण्यात आली. चिनी कलाकारांनी 'तू तू है वही, दिल ने जिसे अपना कहा' हे गाण्याची धुन वाजवली. यावेळी शी जिनपिंग आणि मोदी दोघांनीही त्याचा आनंद घेतला. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी नौकाविहार केला. शुक्रवारी मोदी आणि जिनपिंग यांच्या तीन भेटी झाल्या. या तिन्ही भेटी वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या. 

 

मोदींनी दिले जिनपिंग यांना भारत भेटीचे निमंत्रण 
- दोन्ही देशांच्या शिष्टमंडळ चर्चेत मोदींनी जिनपिंग यांना सांगितले की जगात शांतता, स्थिरता आणि समृद्धी आणण्यासाठी भारत-चीन महत्त्वाची भूमिका निभावतील. जगाच्या 40 टक्के लोकसंख्या या दोन्ही देशात राहाते. आमच्याकडे स्वतःसोबत जगासाठी काम करण्याची संधी आहे. वैश्विक शांततेसाठी आपण महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अनौपचारिक वार्ता परिषदांची परंपरा सुरु करण्याचे आवाहन करत मोदींनी जिनपिंग यांना पुढील वर्षी (2019) भारत भेटीचे निमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारले आहे. 

 

मोदींनी जिनपिंग यांना दिले धन्यवाद 
- मोदी म्हणाले, भारतीय नागरिकांना अभिमान वाटत आहे की मी असा पंतप्रधान आहे की ज्यांच्यासाठी तुम्ही (शी जिनपिंग) दोनवेळा राजधानीच्या बाहेर आले. 
- 'मला आनंद आहे की या समिटला तुम्ही एवढे महत्त्व दिले. ही अनौपचारिक परिषद आपल्या संबंधांना अधिक दृढ आणि विकसित करेल. मला आनंद होईल की 2019 मध्ये अशाच एका अनौपचारिक समिटची संधी आम्हाला मिळेल.'

बातम्या आणखी आहेत...