Home | International | China | North Korea Kim Jong-Un Sudden Visit China

ट्रम्पबरोबर भेटीनंतर 8 दिवसांत अचानक बीजिंगला पोहोचले किम, 4 महिन्यात तिसरा चीन दौरा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 19, 2018, 09:50 AM IST

किम मंगळवारी सकाळी विमानाने बीजिंगला पोहोचला. एअरपोर्टवरून निघाल्यानंतर सुरक्षारक्षकांच्या बाईक्सने कार घेरलेली होती.

 • North Korea Kim Jong-Un Sudden Visit China
  किम 2011 मध्ये सत्ता सांभाळल्यानंतर 2018 मध्ये प्रथमच चीनला पोहोचला होता. - फाइल

  - किम जोंग उनचा हा तिसरा चीन दौरा आहे.

  - 11 जूनला डोनाल्ड ट्रम्पला भेटल्यानंतर प्रथमच किम दुसऱ्या देशाच्या प्रमुखाला भेटत आहेत.

  बीजिंग - नॉर्थ कोरियन नेता किम जोंग ऊन मंगळवारी सकाळी अचानक दोन दिवसांच्या बीजिंग दौऱ्यावर पोहोचला. याठिकाणी किम चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटतील. अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा करण्याबरोबरच दोन्ही नेत्यांमध्ये काही करार होण्याचीही शक्यता आहे. 2011 मध्ये सत्तेत आल्यानंतर किम तिसऱ्यांदा चीनला पोहोचले आहेत. गेल्या चार महिन्यात हे तीन दौरे झाले आहेत. 12 जूनला ट्रम्प यांना भेटल्यानंतर किम यांनी प्रथमच एखाद्या देशाच्या प्रमुखाची भेट घेतली आहे. किम ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत जिनपिंग यांना माहिती देणार असल्याचे समजतेय.


  चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने किम यांच्या दौऱ्याची माहिती त्यांचे विमान बीजिंगला पोहोचणार होते तेव्हा दिली. किम सर्वात आधई रेल्वेद्वारे चीनला पोहोचले होते. त्यांचा दुसरा दौरा मेच्या सुरुवातीला झाला होता. मार्चमधील त्यांचा दौरा तर अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. अगदी बीजिंगहून ते रवाना झाल्याची माहितीही देण्यात आली नव्हती.


  कोळसा आणि तेल पुरवठ्यावरून बंदी हटवण्याची अपेक्षा
  एकापाठोपाठ अणूचाचणी केल्याने संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियावर काही निर्बंध लादले होते. त्यानंतर अमेरिकेच्या दबावानंतर चीननेही उत्तर कोरियाला कोळसा आणि तेलाचा पुरवठा थांबवला होता. किम यांच्या दौऱ्यानंतर हा पुरवठा पुन्हा सुरू करण्याची अपेक्षा केली जात आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, भेटीदरम्यान किम आणि शी आगामी रणनितीवर चर्चाही करतील.


  ट्रम्प यांच्याशी भेटीनंतर किम यांनी घोषणा केली होती की, उत्तर कोरिया अण्वस्त्रे संपवण्यास तयार आहे. त्याबदल्यात अमेरिकेने त्यांना सुरक्षेची हमी दिली होती.

 • North Korea Kim Jong-Un Sudden Visit China
 • North Korea Kim Jong-Un Sudden Visit China

Trending