आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rituals: येथे लग्नच करत नाही कोणी, तरुणी दररोज शोधू शकतात नवा पार्टनर अन् ठेवू शकतात रिलेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या मोसुओ ट्राइब्सच्या महिला. - Divya Marathi
चीनच्या मोसुओ ट्राइब्सच्या महिला.

युनान (चीन) - जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या ट्राइब्स राहतात आणि त्यांचे रीतिरिवाजही तेवढेच विचित्र आहेत. चीनच्या युनान आणि सिचुआन प्रांतांत राहणारी मोसुओ जमातही यापैकीच एक आहे. या ट्राइब्समध्ये लग्न करण्याचा कोणताही रिवाज नाही. तरुण-तरुणी आपल्या मर्जीने पार्टनर निवडतात, परंतु त्यांच्यात ना लग्न होते, ना मुलगी मुलाच्या घरी नांदायला जाते. हे संबंध एक दिवस ठेवले जातात किंवा दीर्घकाळही असू शकतात. ते सर्वस्वी दोघे मिळून ठरवतात. मुलांना मात्र प्रत्येक रात्र मुलीच्या घरी घालवावी लागते.

 

13 वर्षे वयाचे झाल्यावर निवडू शकतात पार्टनर
चाइना डेलीनुसार, या ट्राइब्समध्ये मुलीचे वय 13 वर्षे झाल्यानंतर ती आपला पार्टनर निवडू शकते. मुलीप्रमाणेच पार्टनर निवडण्याचा अधिकार मुलांनाही असतो, परंतु मुलीच्या सहमतीनेच. मुलगी अथवा मुलाने ज्याला पसंत केले तो तिला चारकोल, मिरची आणि चिकनच्या पंखांनी भरलेले एक पाकिट गिफ्ट म्हणून पहिल्या प्रेमाची कबुली देतो. मग मुलगी अथवा मुलाच्या राजीखुशीने संबंधांशी सुरुवात होते. तथापि, संबंध सुरू करण्याआधी हे आवश्यक असते की, मुलगा-मुलगी दोघेही मोसुओ जमातीचेच असावेत.

 

दररात्री मुलीच्या घरी जातो मुलगा
चाइना डेलीनुसार, संबंध सुरू केल्यानंतरही मुलगा आणि मुलगी दोघेही आपापल्या घरीच राहतात. फक्त मुलगा प्रत्येक रात्र मुलीच्या घरात काढतो आणि सकाळी आपल्या घरी निघून जातो. जोपर्यंत मुलगा अथवा मुलीची मर्जी असते, तोपर्यंत दोघेही सोबत वेळ घालवतात आणि ज्या दिवशी दोघांपैकी एकालाही हे संबंध संपवायचे असतील, ते एकमेकांना सांगून संबंध संपुष्टात आणतात. यानंतर दोघेही आपल्या नव्या पार्टनरचा शोध घेऊ लागतात. याला वॉकिंग मॅरिज नावानेच ओळखले जाते.

 

चालते महिलांचीच मर्जी
मोसुओ ट्राइब्समध्ये कुटुंबावर पुरुषांची नाही, तर महिलांची सत्ता चालते. घरातील सर्व महत्त्वाचे निर्णय महिलाच घेतात. या जमातीत पुरुषांचे काम मासेमारी करणे, जनावरांचे पालन करणे असे असते. त्यांना अक्सियास म्हटले जाते. येथे लोकांना त्यांच्या वडिलांच्या नावाने नाही, तर आईच्या नावाने ओळखले जाते. 

  

पुढच्या स्लाइडवर पाहा, चीनच्या या मोसुओ ट्राइब्सचे आणखी काही Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...