Home | International | China | Suspicious Wife Chops Off Husband Private Part With Scissors in China

अचानक बाथरुममध्ये घुसली शंकेखोर बायको; कात्रीने छाटले नव-याचे Private Part

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 04:27 PM IST

अचानक बाथरुममध्ये त्याची पत्नी घुसली आणि कात्रीने लीचा प्रायव्हेट पार्ट छाटून वेगळा केला.

 • Suspicious Wife Chops Off Husband Private Part With Scissors in China

  बीजिंग - चीनमध्ये एका शंकेखोर पत्नीने आपल्या पतीचे लिंगच छाटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिआंक्षी प्रांतातील फेंगचेंग शहरात राहणारा ली शनिवारी सकाळी घरातील बाथरुममध्ये ब्रश करत होता. लीच्या अंगावर कपडे नव्हते. त्याचवेळी अचानक बाथरुममध्ये त्याची पत्नी घुसली आणि कात्रीने लीचा प्रायव्हेट पार्ट छाटून वेगळा केला. आपल्यासोबत काय घडले हे कळण्यापूर्वीच अख्ख्या बाथरुममध्ये रक्त सांडले होते. कसे-बसे लीने हाताने रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करून रुग्णालय गाठले.


  काय आहे प्रकरण...
  रुग्णायात उपचारासाठी दाखल असलेल्या पीडित पतीने स्थानिक माध्यमांसमोर आपबिती मांडली. पीडित पतीला नुकतीन नवी नोकरी मिळाली होती. या कार्यालयात जाण्याच्या येण्याच्या वेळेच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची पत्नी संशय घेत होती. कार्यालयातील कुठल्याही महिलेशी बोलायचे नाही. ऑफिसमधून परतल्यानंतर कुठल्याही महिला सहकाऱ्याचे फोन येता कामा नये अशी ताकीद तिने पतीला दिली होती. थोडासा उशीर झाल्यास घरात मोठे भांडण पेटायचे. त्यात एखाद्या महिला सहकाऱ्याचा कॉल आला तेव्हा ती बोलणे बंद करायची. काही दिवसांपूर्वीच एका महिला सहकाऱ्याशी फोनवर बोलल्याने तिने बोलणे बंद केले होते. दिवस-रात्र तिच्या डोक्यात संशय भरला होता. शंकेखोर पत्नीने शुक्रवारीच पतीसोबत जोरदार भांडण केले होते. यानंतर शनिवारी सकाळी जेव्हा तो बाथरुममध्ये होता, त्याचवेळी त्याच्यावर कात्रीने अचानक हल्ला केला.


  सर्जरी करून जोडले प्रायव्हेट पार्ट
  जिआंक्षी प्रांतातील रुग्णालय गाठताना पीडित पती आपल्यासोबत छाटलेले प्रायव्हेट सुद्धा घेऊन गेला होता. घटना ताजी असल्याने आणि वेळेवर रुग्णालय गाठल्याने सर्जरी करून ते पुन्हा आपल्या जागी लावण्यात आले. तरी जखम बरी झाल्यानंतर सुद्धा तो आयुष्यभर पूर्णपणे बरा होणार नाही असा इशारा डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, तूर्तास प्रायव्हेट पार्ट सर्जरी करून लावण्यात आला आहे. परंतु, जखम ताजी असल्याने अचानक झालेल्या संवेदना जखमेवर घातक ठरू शकतात. सोबतच, जखम पूर्णपणे भरल्यानंतर सुद्धा तो योग्यरित्या शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकणार नाही.

Trending