आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शी जिनपिंग विरोधात Not My President मोहिम, परदेशांत झळकले पोस्टर्स...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत संसदेत वादग्रस्त कायदा मंजूर केला. या कायद्याने ते आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष पदी राहू शकतात. याचे पडसाद आता परदेशांत राहणाऱ्या चिनी लोकांमध्ये कॅम्पेनच्या स्वरुपात उमटले आहेत. पाश्चात्य देशांमध्ये शिकणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांनी शी यांच्या विरोधात #NotMyPresident मोहिम सुरू केली आहे. यात विविध विद्यापीठ आणि इतर परिसरांमध्ये चिनी आणि इंग्रजी भाषेतील पोस्टर्स लावले जात आहेत. यासाठी ट्विटरवर एक पेज देखील तयार करण्यात आले आहे. 

 

या विरोधामागे कोण?
पोस्टर्स लागण्याची सुरुवात सर्वप्रथम अमेरिकेत झाली. गेल्या आठवड्यात शी यांनी संसदेत कायदा मंजूर करणार अशी घोषणा केली तेव्हापासूनच अमेरिकेत अशा प्रकारचे पोस्टर्स झळकायला लागले. यानंतर हे बॅनर आता ब्रिटन, फ्रान्स आणि नेदरलंडसह कॅनेडियन विद्यापीठांमध्ये सुद्धा दिसून आले. ट्विटरवर @StopXiJinping या अकाउंटच्या माध्यमातून लोकांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या आंदोलनास परदेशांत शिकणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद आहे. पण, त्यापैकी कुणीही आपले नाव जाहीर करत नाही. 

 

माओनंतर सर्वात शक्तीशाली नेते बनले शी
- 64 वर्षीय शी जिनपिंग सलग दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत. कायद्यानुसार, त्यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढवता येत नव्हती. त्यामुळे, आता त्यांनी संसदेत 2 वेळा निवडणुकीची कमाल मर्यादाच रद्द केली. अशात चीनचे आतापर्यंतचे सर्वात शक्तीशाली नेते माओत्से तुंग यांच्यानंतर शी दुसरे सर्वात ताकदवान नेते म्हटले जात आहेत. 
- यापूर्वीच त्यांनी संरक्षण, सर्वात मोठ्य़ा आणि एकमेव राजकीय पक्षाचे प्रमुख, सर्व महत्वाच्या समित्या यांचे प्रमुख पद स्वीकारले. यासाठी त्यांनी वेळोवेळी कायद्यात सुधारणा देखील केल्या. चीनमध्ये त्यांच्या तोडीचा एकही नेता नाही. त्यातच नवीन कायदा मंजूर करून त्यांनी आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष पदी निवडून येत राहण्याचा मार्ग मोकळा केला आहे. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, चीनचे माओत्से तुंग यांनी 1966 ते 1976 पर्यंत राष्ट्राध्यक्ष भोगला. त्यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या डेंग जाओपिंग यांनी दुसरा माओ टाळण्यासाठी 1982 मध्ये 2 वेळा राष्ट्राध्यक्ष होण्याची मर्यादा लागू केली. आता शी जिनपिंग यांनी ती मर्यादा मोडून काढली आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शी विरोधात सुरू झाली पोस्टरबाजी...

बातम्या आणखी आहेत...