आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीजिंग- चीनची संसद नॅशनल पीपल्स काँग्रेसने (एनपीपी) शनिवारी शी जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्षपदावर पुन्हा निवड केली. त्यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. त्यास सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे. चीनच्या भ्रष्टाचारविरोधी संस्थेचे प्रमुख ६९ वर्षीय वांग किशान यांची उपराष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाली आहे.
जिनपिंग यांच्या समर्थनार्थ २ हजार ९७० मते पडली. वांग यांच्या बाजूने २ हजार ९६९ मते पडली. एक मत त्यांच्याविरोधात गेले. या दरम्यान कोणताही सदस्य अनुपस्थित राहिला नाही. ६४ वर्षीय जिनपिंग यांची केंद्रीय लष्कर आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी दुसऱ्यांंदा निवड करण्यात आली. जिनपिंग राष्ट्राध्यक्ष पदाबरोबरच सशस्त्र सैन्याचे प्रमुख आहेत. त्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे (सीपीसी) सरचिटणीसदेखील आहेत. अर्थात देशाच्या सर्वोच्च तीन पदांवर त्यांचाच ताबा राहील. २०१३ मध्ये पहिल्यांदाच जिनपिंग राष्ट्राध्यक्ष बनले. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या कार्यकाळासाठी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने (सीपीसी) त्यास मंजुरी दिली होती. एनपीसीची शनिवारी बैठक झाली. त्यात सरकारी कामकाजाबरोबरच अनेक दुरुस्त्या व ११ मंत्रालयांतील बदलास मंजुरी देण्यात आली आहे.
जिनपिंग यांच्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती
माआे जेडांग यांच्यानंतर चीनच्या सर्वोच्च नेत्याची उपाधी मिळाली आहे. राज्यघटनेत त्यांच्या तत्त्वज्ञानालाही स्थान दिले. जिनपिंग यांना २०२३ मध्येे तिसऱ्यांदा व त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्राध्यक्ष पदावर राहण्यासाठी एनपीसीने ११ मार्च रोजी घटनेत दुरुस्त्या केल्या.
2023 मध्ये सीपीसीतून घेणार निवृत्ती
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये शी जिनपिंग कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होतील. 2013 मध्ये ते या पक्षाचे प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.
- नॅशनल पीपल्स कमिशन एनपीसीने जिनपिंग यांचे जवळचे अधिकारी वांग किशान यांना उपराष्ट्राध्यक्ष पदी नियुक्त केले आहे.
- पंतप्रधान पदावर ली केकियांग यांनाच ठेवण्यात आले आहे. मात्र, समस्त कॅबिनेटसह सेंट्रल बँकेचे गव्हर्नर देखील बदलण्यात येणार आहेत.
भारतावर काय परिणाम?
- नवीन कॅबिनेटमध्ये परराष्ट्र मंत्री वांग यी यांना स्टेट काउंसलर पदी निवडले जाणार अशी शक्यता आहे. अशात ते देशाचे सर्वोच्च डिप्लोमॅट होतील. भारत-चीन सीमा वादात ते महत्वाची भूमिका बजावतील असे म्हटले जात आहे.
- सध्या भारतासाठी चीनचे स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह यांग जीईची आहेत. आता त्याना पॉलिट ब्युरोमध्ये पाठवण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, माओनंतर सर्वात शक्तीशाली नेते बनले शी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.