Home | International | China | Buildings Collapse In Front Of Shocked People During Mudslides And Rains, Shocking Video

OMG: पूर-पावसात पत्त्यांसारख्या कोसळल्या इमारती, पाहा धक्कादायक VIDEO

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 27, 2018, 11:32 AM IST

मुसळधार पाऊस, पूर आणि दरळ कोसळीच्या घटनांमुळे येथील इमारती अगदी पत्त्यांप्रमाणे कोसळल्या.

 • Buildings Collapse In Front Of Shocked People During Mudslides And Rains, Shocking Video

  इंटरनॅशनल डेस्क - असमानी कहरची ही भयंकर दृश्ये चीनच्या ग्वांगशी प्रांतातील आहेत. मुसळधार पाऊस, पूर आणि दरळ कोसळीच्या घटनांमुळे येथील इमारती अगदी पत्त्यांप्रमाणे कोसळल्या. त्याच धक्कादायक घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ग्वांगशी प्रांतात असलेल्या वेइजियागोउ या गावात अशाच प्रकारे 20 इमारती कोसळल्या आहेत. या असमानी संकटामुळे शेकडो नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे.


  असे होते दृश्य...
  - ग्वांगशी प्रांतातील बेस जिल्ह्यात असलेल्या या गावात सरासरी 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे, गेल्या एका आठवड्यात पूर, दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
  - इमारती कोसळण्याचे व्हिडिओ तेथील स्थानिकांनीच कैद केले आहेत. त्यामध्ये गावातील इमारती एकानंतर एक कोसळताना दिसून येत आहेत. यात काही लोक त्या इमारती पडताना आपल्या डोळ्यांनी पाहताना दिसून येतात.
  - अशाच प्रकारच्या एकूण 23 इमारती कोसळल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये सर्वात उंच इमारत 6 मजली होती. सोबतच, एका अंगणवाडीच्या बिल्डिंगचा सुद्धा समावेश होता. व्हिडिओमध्ये भयंकर दृश्ये पाहून लोकांच्या ओरडण्याचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहेत.


  एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
  - जवळच्याच लिंग्युन काउंटीमध्ये दरड कोसळल्याने इमारतीच्या ढिगाराखाली दबून एकाच कुटुंबातील 6 सदस्यांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनाने त्या सर्वांचे मृतदेह बाहेर काढले.
  - स्थानिक प्रशासनाकडून गाव आणि रस्त्यांच्या दुरुस्तीचे तसेच लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरूच आहेत. सलग 7 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर आलेल्या पूराचा सव्वा लाख नागरिकांना फटका बसला. तसेच 2000 नागरिक बेघर झाले आहेत.


  पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो आणि इमारती कोसळण्याचा व्हिडिओ...

 • Buildings Collapse In Front Of Shocked People During Mudslides And Rains, Shocking Video
 • Buildings Collapse In Front Of Shocked People During Mudslides And Rains, Shocking Video

Trending