आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या कारच्या खिडकीत बसून अभ्यास करतेय ही विद्यार्थिनी, कारण धक्कादायक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनमध्ये सध्या या शालेय विद्यार्थिनीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. धावत्या टॅक्सीच्या खिडकीवर बसलेली ही विद्यार्थिनी आपले होमवर्क पूर्ण करत आहे. विशेष म्हणजे, तिचे वडील सुद्धा त्याच टॅक्सीमध्ये आहेत. ज्या धावत्या कारच्या खिडकीवर बाहेरून ती बसली, त्यातील ड्रायव्हिंग सीटवर तिचे वडील आहेत. चीनचे स्थानिक माध्यम सीजीटीएनने हा व्हिडिओ युट्यूबवर शेअर केला. सर्वांनाच हैराण करणाऱ्या या व्हिडिओमध्ये मुलीने असा निर्णय का घेतला, त्याचे कारण सुद्धा तेवढेच धक्कादायक आहे. 


हे होते कारण...
> टॅक्सी ड्रायव्हर असलेले चेंग आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात होते. पण, त्या मुलीने आपले होमवर्क पूर्ण केले नव्हते. तिला आपला गृहपाठ टॅक्सीत बसून सुद्धा पूर्ण करता आला असता. पण, तिने धावत्या टॅक्सीच्या बाहेर चक्क खिडकीवर बसून असे का केले याचे कारण अजब आहे. 
> तिच्या वडिलांसोबत त्या टॅक्सीमध्ये त्यांचा एक मित्र सुद्धा बसला होता. ते दोघे गप्पा मारत होते. त्यांच्या गप्पांवरून होमवर्कमध्ये या मुलीचे लक्ष लागत नव्हते. त्यांच्या बोलण्यामुळे त्रास होत असल्याचे पाहता तिने चक्क मागच्या सीटच्या खिडकीचा काच उघडला आणि त्यावर जाऊन बसली. 


वडील काय म्हणाले...
> व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक माध्यमांनी त्या टॅक्सीचालकाचा शोध घेतला. त्याने ही मुलगी आपलीच असल्याचे म्हटले. तसेच आपण मित्रासोबत गप्पा मारण्यात इतके मशगूल होतो की ती कधी खिडकीवर जाऊन बसली हे कळालेच नाही असे चेंग म्हणाले. 
> या घटनेची पोलिस प्रशासनाने सुद्धा गंभीर दखल घेतली. तसेच टॅक्सी ड्रायव्हर चेंगचा परवाना रद्द केला. तसेच त्याला आयुष्यभर टॅक्सी चालवण्यापासून बॅन करण्यात आले आहे.

 

पुढे पाहा, या घटनेचा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...