Home | International | China | Chinese Youth Thrashes Young Boy Kicked His Face Having Fun On A Bus

बसमध्ये मस्ती करत होता मुलगा, रागाच्या भरात प्रवाशाने केले असे काही...

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 02, 2018, 10:24 AM IST

चीनमध्ये टिपलेल्या या व्हिडिओवरून जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आह

 • Chinese Youth Thrashes Young Boy Kicked His Face Having Fun On A Bus

  बीजिंग - चीनमध्ये टिपलेल्या या व्हिडिओवरून जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. बसमध्ये घडलेल्या या प्रकारात एक व्यक्ती लहान मुलाच्या मस्ती करण्यावर इतका चिडला की त्याने क्रौर्याची मर्यादा ओलांडली. त्याने केवळ त्या मुलाला मारलेच नाही तर आपल्या खांद्यापर्यंत उचलून आपटले. यानंतरही त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर लाथा मारल्या. हा व्हिडिओ इतका भयंकर आहे, की पाहून अंगावर काटा येतो.

  काय आहे या व्हिडिओमध्ये...
  - चीनचे स्थानिक ऑनलाइन मीडिया Shanghaiist च्या वृत्तानुसार, शिचुआन प्रांताच्या स्विनिंग शहरातील लोकल बसमध्ये ही घटना घडली. 27 एप्रिल रोजी एक लहान मुलगा आपल्या शाळेतून एकटाच बसने घरी जात होता. तो आपल्या समोरच बसलेल्या एका युवकाला मस्ती म्हणून मारत होता. त्याचे बूट त्या व्यक्तीच्या हातावर लागत असल्याचे दिसून आले.
  - मस्ती केल्यानंतर आपल्यासोबत काय घडेल याची त्या मुलाला कल्पनाही नव्हती. त्याने त्या युवकाकडे पाठ फिरवताच तो युवक आपल्या जागेवरून उठला. बाजूला बसलेले लोक काही विचार करतील, त्यापूर्वीच त्या युवकाने मुलाची गच्ची धरली आणि आपल्या खांद्यापर्यंत उचलून हवेत फिरवून खाली आदळले. यानंतरही तो थांबला नाही. आपली शुद्धी गमावून पालथा झालेल्या त्या मुलाच्या डोक्यावर आणि पाठीवर बेदम लाथा मारल्या.

  माफी मागितली...
  मारहाणीनंतर बाजूलाच असलेल्या एका महिलेने पोलिसांना फोन लावला आणि इतरांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्या युवकाचे नाव गुओ असून त्याला 15 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने या घटनेनंतर पीडित मुलाच्या आई-वडिलांची माफी मागितली. कामाच्या दबावामुळे आपण तसे वागलो आणि आता चूक लक्षात आल्याचे तो म्हणाला. मारहाणीमुळे पीडित मुलाचा चेहरा सुजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

  सूचना - पुढील स्लाइडवर व्हिडिओ आपले मन विचलित करू शकतो...

Trending