आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीजिंग - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी संसदेत ऐतिहासिक घटनादुरुस्ती करत आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष पदी राहण्याचा मार्ग मोकळा केला. चीनसह जगभरात ही सर्वात मोठी बातमी होती. मात्र, या दरम्यान प्रशासकीय घडामोडींचे वार्तांकन करणारी एक रिपोर्टर त्या बातमीपेक्षा व्हायरल ठरत आहे. जगभरात तिचा व्हिडिओ शेअर केला जात आहे. तिच्या डोळ्यांच्या नखऱ्यांमुळे ती सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
काय आहे या व्हिडिओमध्ये?
चीनच्या संसदेने ऐतिहासिक घटनादुरुस्तीला मंजुरी दिली त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्याच पत्रकार परिषदेत लाल ब्लेझरमध्ये असलेली एक महिला रिपोर्टर अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत होती. तेव्हा तिच्या बाजूलाच असलेली निळ्या ब्लेझरवाल्या महिला रिपोर्टरने डोळे आणि चेहऱ्यांवर जे भाव आणले तेच व्हायरल ठरले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हायरल फोटोज व्हिडिओ आणि तिला ट्रोल करताना अपलोड झालेला व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.