आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ghost Marriage: अविवाहित युवकांचा मृत्यू झाल्यास येथे मृतदेहांसोबत लावतात लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या ग्रामिण भागांमध्ये आजही 3000 वर्षे प्राचीन असलेल्या भूतांच्या लग्नाची परमपरा सुरू आहे. यात एखाद्या युवकाचा मृत्यू अविवाहित असताना झाल्यास त्याला एकटे दफन केले जात नाही. त्याचा एका तरुणीच्या मृतदेहाशी पारमपारिक विवाह करून दिला जातो. त्यानंतर त्या दोघांचे मृतदेह एकाच ठिकाणी पुरले जातात. असे केल्याने अविवाहित तरुणाच्या आत्म्याला शांती मिळते तसेच त्याचे एकटेपण दूर होते अशी स्थानिकांची आस्था आहे. परंतु, यात सर्वात मोठे आव्हान आहे ते अविवाहित तरुणाचा मृत्यू झाल्यास त्याच्यासमवेत पुरण्यासाठी तरुणीचा मृतदेह शोधणे. त्यामुळे, चीनच्या ग्रामिण भागांमध्ये महिलांच्या मृतदेहांच्या तस्करीचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. शाप लागेल या भितीने लोक असे करतात.

 

शाप लागण्याची भिती...
- स्थानिकांची मान्यता आहे, की अविवाहित तरुणाचा मृत्यू त्याच्या कुटुंबियांसाठी एक शाप आहे. अशात तरुणीच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी ही परमपरा पाळली जाते. अशा प्रकारे लावल्या जाणाऱ्या विवाहांना घोस्ट मॅरेज अर्थात भूतांचा विवाह असे म्हटले जाते. 
- ग्रामिण भागांमध्ये त्यातही प्रामुख्याने शांक्षी प्रांतात याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. अनेक ठिकाणी या परमपरा लपवून पार पाळल्या जातात. 2 वर्षांपूर्वी एका कुटुंबात अविवाहित मुलाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांना तरुणीचे मृतदेह आणण्यासाठी 18 लाख रुपये मोजावे लागले. 


असा चालतोय मृतदेहांचा धंदा
- परमपरेच्या नावावर काही माफिया सक्रीय झाले आहेत. हेच लोक युवकांच्या मृत्यूनंतर त्यांना तरुणींचे आणि महिलांचे मृतदेह पुरवठा करत आहेत. 2014 मध्ये मृतदेहांच्या तस्करी प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली होती. हे लोक चक्क कब्रस्तानातून कब्री चोरून त्यांची बाजारात विक्री करत होते. 
- चोरांनी सुद्धा याला आपला धंदा बनवले आहे. त्यांना एका मृतदेहामागे किमान 2 लाख रुपये इतकी किंमत मिळायला लागली आहे. मृतदेह जितके नवीन असेल त्याची बाजारातील किंमत तितकीच जास्त राहील. झीज झालेल्या मृतदेहाला बाजारात किंमत नाही. 
- याच प्रकरणात पैसा गोळा कमवण्यासाठी महिलांचे मर्डर सुद्धा झाले आहेत. आतापर्यंत अशा 12 प्रकरणांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये महिलांना ठार मारून त्यांचे मृतदेह घोस्ट मॅरेजसाठी विकण्यात आले.


पुढील स्लाइड्सवर, या प्रकरणांचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...