या हॉटेलात ग्राहकांना मिळतेय Free Beer, पोटभर जेवण; अट एवढीच
चीनमध्ये नुकतेच उघडलेले एक हॉटेल आपल्या ग्राहकांना मोफत बिअर आणि पोटभर जेवण देत आहे.
-
बीजिंग - चीनमध्ये नुकतेच उघडलेले एक हॉटेल आपल्या ग्राहकांना मोफत बिअर आणि पोटभर जेवण देत आहे. झाओ लांग यांनी चीनच्या जिनान शहरात हे हॉटेल उघडले. तसेच प्रसिद्धीसाठी त्यांनी ही शक्कल लढवली. पण, येथे मोफत बिअर आणि जेवण मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. आपल्या हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ त्याने एक गेट लावला आहे. साखळ्यांना बांधलेल्या या गेटमध्ये छोटे-छोटे गॅप ठेवण्यात आले आहे. या सर्व साखळ्यांच्या मधून जो ग्राहक प्रवेश करू शकेल त्यालाच ही ऑफर दिली जाणार आहे.
असे आहेत नियम
- झाओ लांग यांनी हॉटेलची प्रसिद्धी करण्यासाठी लढवलेली शक्कल जगभरात व्हायरल ठरत आहे. त्यांनी आपल्या या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांचा एक प्रोमो तयार करून युट्यूबवर अपलोड केला आहे. त्यामध्ये ग्राहक गेटच्या सळ्यांमध्ये असलेल्या गॅपमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.
- या गेटमध्ये अशा प्रकारचे 5 गॅप आहेत. प्रत्येक गॅपचे अंतर आणि व्यास ठराविक आहे. पाचपैकी सर्वात छोटा गॅप 5.9 इंच इतका बारिक आहे. त्यातून बाहेर निघणाऱ्या ग्राहकाला झाओ लांग मोफत बिअर आणि जेवण देत आहेत. त्यांनी या प्रकाराला 'मेटल गेट चॅलेंज' असे नाव दिले आहे.
- सर्वात मोठा गॅप 11.8 इंच एवढा आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना अल्पसा डिस्काउंट दिला जातो. तसेच आपण तेवढे स्लिम नाहीत असे सांगितले जाते. दुसऱ्या सर्वात मोठ्या क्रमांकाच्या गॅपमधून बाहेर येणाऱ्यांना मोफत बिअर दिली जाते. तर 7 इंची गॅपमधून आत-बाहेर होऊ शकणाऱ्या ग्राहकाला बिअरच्या 7 बाटल्या मोफत दिल्या जातात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि व्हिडिओ... -
-
More From International News
- मसूदला दहशतवादी घोषित करण्यास चीनचा पुन्हा नकार; चीनकडून खोडाअनेक देशांच्या दहशतवादी यादीत अझहरचे नाव
- Terror Attack: मास्टरमाइंड मसूद अझहरला वाचवण्याचा चीनचा प्रयत्न, जागतिक दहशतवादी घोषित करण्यास अजूनही नकार
- प्रदूषणाने चीनमध्ये आयुर्मान 2.9 वर्षांनी घटले ,वार्षिक 11 लाख मृत्यू; अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी संस्थेचा दावा