आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आजीला हात लावायचा नाही!' काठी घेऊन पोलिसांशी भिडला हा चिमुकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - सोशल मीडियावर या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अवघ्या 2 वर्षांचा वाटणारा हा चिमुकला काठी घेऊन चक्क पोलिसांशी भिडल्याचे दिसून येते. तो चिनी भाषेत पोलिसांना आरडा-ओरड करत आहे. चीनच्या इंग्रजी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तो "दूर हो, माझ्या आजीला हात लावायचा नाही." असे पोलिसांना सांगत होता.

 

नेमके काय झाले?
- हा व्हिडिओ आता व्हायरल होत असला तरीही प्रत्यक्षात तो 2016 मध्ये टिपला होता. चीनच्या एका शहरात अनाधिकृत भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई सुरू होती. पोलिस या फेरिवाल्यांचे दुकान उद्ध्वस्त करून भाजीपाला फेकत होते. त्याचवेळी त्यांना एक वयोवृद्ध महिला आणि तिचा नातू सापडले. 
- पोलिस गेले तेव्हा एका फाटलेल्या जुन्या लाल सोफ्यावर हा चिमुकला निवांत बसलेला होता. पोलिसांनी त्याला बळजबरी उठवले आणि आजीला राग-राग करायला लागले. त्याचा या छोटूला इतका राग आला की त्याने चक्क अगदी मोठ्या माणसाप्रमाणे पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. 
- पोलिसांनी ऐकले नाही, तेव्हा तो एक लांब काठी घेऊन पोलिसांना मारायला त्यांच्या अंगावर धावून गेला. तेवढ्यात पोलिसांना हसू आवरले नाही. लोकांसोबत त्यांनीही मोबाईल काढून शूटिंग करण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनाच माघार घ्यावी लागली. यानंतर तो पुन्हा सोफ्यावर जाऊन बसला. 

 

पुढे पाहा, तो व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...