Home | International | China | Top Chinese Science Institution Apologises After Sacrificing Goat at Nuclear Reactor Opening

चीनच्या अणुप्रकल्प उद्घाटनात भोंदुगिरी; बोकडाचा बळी दिल्याने वाद, माफी मागितली

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 04, 2018, 04:57 PM IST

चीनमध्ये चक्क अणु प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी सुद्धा जनावरांचे बळी दिले जातात. अशाच एका प्रकरणामुळे चीनच्या नावाजलेल्या स

 • Top Chinese Science Institution Apologises After Sacrificing Goat at Nuclear Reactor Opening

  बीजिंग - चीनमध्ये चक्क अणु प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी सुद्धा जनावरांचे बळी दिले जातात. अशाच एका प्रकरणामुळे चीनच्या नावाजलेल्या सायन्स इंस्टिट्युटला जाहीर माफी मागावी लागली आहे. पायाभूत विकास आणि माहिती-तंत्रज्ञानात अमेरिकेसह कुठल्याही देशाला मागे टाकण्यासाठी धावपळ करणाऱ्या चीनमध्ये मोठ-मोठे वैज्ञानिक सुद्धा अंधश्रद्धा पाळत असल्याचे या घटनेवरून समोर आले. चायना सायन्स इंस्टिट्युटने नुकतेच एका अणु संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्या इमारतीच्या उद्घाटनासाठी चक्क बोकडाचा बळी देण्यात आला आहे. हे प्रकरण इतके वाढले की अखेर विज्ञान विभागाला जाहीर माफी मागावी लागली आहे.


  काय आहे प्रकरण?
  उत्तर चीनच्या गन्सू प्रांतात गुरुवारी (3 मे 2018) रोजी ही घटना घडली आहे. या प्रांतातच चीनच्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांपैकी एक चायना अकॅडमी ऑफ सायन्स (CAS) आहे. सीएएसने गुरुवारी आपल्या एका अणु संशोधन प्रकल्पाच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी धर्मगुरूंना बोलावण्यात आले होते. त्यांच्याच उपस्थितीत सीएएसच्या ज्येष्ठ वैज्ञानिकांनी आपल्याच हस्ते एका छोट्या बोकडाचा बळी दिला. तसेच चीनच्या धार्मिक रुढी परमपरेनुसार, कागद सुद्धा पेटवला. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो देशभर व्हायरल झाला. तसेच चिनी नागरिकांनी या वैज्ञानिकांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर वाढत्या टीकेनंतर अखेर चायना अकॅडमी ऑफ सायन्सला जाहीर माफी मागावी लागली आहे.


  असा आहे माफीनामा...
  सीएसएने जारी केलेल्या माफीनाम्यानुसार, "सीएएसचे सर्वच वैज्ञानिक नेहमीच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत. पण, या प्रकल्पासाठी अशाच प्रकारे विचार करणारे सहकारी मिळवण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच हा वाद झाला आहे. त्यामुळे आम्ही जाहीररीत्या माफी मागतो." या स्पष्टीकरणात सीएएसने अप्रत्यक्षरित्या हा सर्व प्रकार आपल्या वैज्ञानिकांमुळे नाही, तर त्या प्रकल्प आणि इमारतीसाठी सहकार्य करणाऱ्यांमुळे घडले असा संकेत दिला.


  पुढील स्लाइडवर पाहा, तो व्हिडिओ...

Trending