पप्पा रागावले म्हणून! / पप्पा रागावले म्हणून! मुलांवर चिडण्यापूर्वी आवश्य पाहा धक्कादायक VIDEO

पप्पा रागावले म्हणून! मुलांवर चिडण्यापूर्वी आवश्य पाहा धक्कादायक VIDEO.पप्पांनी रागावले म्हणून! मुलांवर चिडण्यापूर्वी आवश्य पाहा धक्कादायक VIDEO.

दिव्य मराठी वेब टीम

May 07,2018 05:20:00 PM IST

इंटरनॅशनल डेस्क - हल्लीच्या लहान मुलांना सांभाळणे एक आव्हान झाले आहे. त्यात अशा मुलांना रागावल्यास कोण-कोणते महाप्रताप करू बसतात याचेच एक उदाहरण चीनमध्ये सापडले आहे. या मुलाच्या पप्पांनी त्याला घरात किती झोपणार असे म्हणत रागावले. त्याचा या मुलाला इतका संताप झाला की त्याने काय केले हे पाहा. तो चक्क पाचव्या मजल्यावर असलेल्या आपल्या घराच्या खिडकीवर आला. त्याच खिडकीच्या छतावर बसून धिंगणा घातला.

>> चीनच्या या 12 वर्षीय मुलाचा व्हिडिओ Pear Video ने आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला. यानंतर तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या मुलाच्या वडिलांनी त्याच्या आळशीपणामुळे रागावले.
>> यावर तो मुलगा इतका चिडला की तो आपल्या पलंगावरून उठला आणि खिडकीच्या बाहेर निघाला. तसेच खिडकीबाहेरच्या छतावर चढला. हात घट्ट बांधून आणि चेहऱ्यावर रागीट भाव आणून त्याने आपण किती रागात आहोत हे दाखवले. घरात झोपण्यावर रागावताय ना? बस? बघा आता मी घराबाहेर झोपलोय म्हणत तो त्याच ठिकाणी झोपला.
>> ही घटना चीनच्या ग्वीझाऊ प्रांतात बुधवारी घडली. आपल्या मुलाच्या नखऱ्यांवर वडील सुद्धा हैराण झाले. त्यांनी वेळीच फायर ब्रिगेडला फोन लावला आणि त्याला सुखरूप खाली उतरवण्यात आले. फायर ब्रिगेड आल्यानंतरही उतरवताना त्याचे नखरे सुरूच होते.


पुढे पाहा, या अफलातून मुलाच्या कारनाम्याचा व्हिडिओ...

X
COMMENT