भर रस्त्यावर पतीला / भर रस्त्यावर पतीला Call करून म्हणाली, 'बघ! तुझ्या गर्लफ्रेंडला कशी हाणतेय...'

दिव्य मराठी वेब टीम

Mar 19,2018 02:57:00 PM IST

बीजिंग - चीनमध्ये एका महिलेने भर रस्त्यावर दुसऱ्या एका महिलेला बेदम मारहाण केली. हा ड्रामा पाहण्यासाठी लोकांनीही मोठी गर्दी केली. मार खाणारी तरुणी मोठ-मोठ्या ओरडून लोकांना मदतीचे आवाहन करत होती. पण, कुणीही तिला वाचवण्यासाठी पुढे जाण्याची हिंमत दाखवू शकला नाही. मारणाऱ्या महिलेने सांगितल्याप्रमाणे, ती युवती तिच्या पतीची गर्लफ्रेंडला होती. भर रस्त्यावरच तिला मारहाण करताना तिने साऱ्या लोकांना संपूर्ण प्रकार सांगितला.

काय आहे या व्हिडिओमध्ये...?
- चीनमध्ये एका महिलेने तरुणीला पाहून अचानक आपली कार थांबली आणि कारमधून उतरताच तिचे केस धरून मारहाण सुरू केली.
- हा ड्रामा पाहण्यासाठी लोकांनी शेकडोंच्या संख्येने गर्दी केली. मार खाणारी तरुणी मोठ-मोठ्याने लोकांना मदतीचे आवाहन करत होती. पण, तिच्या मदतीसाठी कुणीच पुढे आले नाही.
- केस धरून मारहाण करतानाच त्या महिलेने आपला स्मार्टफोन काढला आणि पतीला फोन लावला. ती म्हणाली, "हे बघ तुझ्या गर्लफ्रेंडला भर रस्त्यावर पकडून कशी मारहाण करत आहे." तिने व्हिडिओ कॉलने ते दृश्य पतीला दाखवले आणि फोन कट केला.
- यानंतर तिनेच जमावाला सांगितले, "ही माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड आहे. गेल्या तीन वर्षांपासून या दोघांचे अफेअर सुरू आहे. ही लोकांची घरे उद्ध्वस्त करणारी बाई आहे."
- सोबत तिने तरुणीला जे काही जमावासमोर बोलायला सांगितले ती मजबुरीने सर्व काही सांगत होती. आपण, तिच्या पतीची गर्लफ्रेंड असल्याचेही तिने मान्य केले.
- प्रशासनाने त्या महिलेवर कोणती कारवाई केली हे स्पष्ट झाले नाही. तरीही सोशल मीडियावर तिने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो आणि तो व्हिडिओ...

X
COMMENT