Home | International | China | Absolute Supporters Of The Former Supreme Leader Of China Mao, Some Weird Facts

प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी बनले नरभक्षक, जेव्हा सरकार भक्तांनी ओलांडल्या मर्यादा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 21, 2018, 04:43 PM IST

नागरिक जेव्हा सरकारचे भक्त होतात, तेव्हा त्यांना चांगले किंवा वाइट यातील काहीच फरक कळत नाही. काहीही करून आपला नेता किंवा

 • Absolute Supporters Of The Former Supreme Leader Of China Mao, Some Weird Facts
  फाइल फोटो

  इंटरनॅशनल डेस्क - नागरिक जेव्हा सरकारचे भक्त होतात, तेव्हा त्यांना चांगले किंवा वाइट यातील काहीच फरक कळत नाही. काहीही करून आपला नेता किंवा सरकारला खुश कसे करता येईल याकडेच ते लक्ष देतात. चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सत्तेवर विराजमान आहे. कम्युनिस्ट लीडर माओ त्से तुंग याचे संस्थापक सदस्य होते. माओचा सत्ताकाळ संवेदनाहीन अत्याचारांनी भरलेला होता. चीनचे सुप्रीम लीडर असताना माओ यांनी काही वादग्रस्त धोरणे लादली होती. त्याच धोरणांनी चीनच्या 4 ते 7 कोटी जनतेचा जीव घेतला. त्यांच्या कार्यकाळात असे काही निर्बंध आणि सुविधा होत्या, की त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठिण आहे.


  प्रामाणिकता दाखवण्यासाठी एकमेकांना खायचे लोक
  माओ यांच्या राज्यात नरभक्षण एक खूप मोठी समस्या बनली होती. काही रिपोर्ट्सनुसार, पक्षाशी प्रामाणिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी विद्यार्थी नियम मोडत होते. आपल्या प्रतिस्पर्धींना किंवा सरकार विरोधकांना ठार मारून ते त्यांचे मांस खात होते. सरकारी कॅन्टीनच्या बाहेर कथितरीत्या सरकार विरोधकांचे तुकडे किंवा त्यांचे मांस डिस्प्लेमध्ये ठेवत होते. तसेच या लोकांचे मांस लंचमध्ये दिले जात होते. काही लोक नरभक्षणासाठी उपासमारीला तितकेच जबाबदार धरतात.


  पुढील स्लाइड्सवर पाहा, अशाच आणखी काही विचित्र घटनांबद्दल...

 • Absolute Supporters Of The Former Supreme Leader Of China Mao, Some Weird Facts

  अमेरिकेला गिफ्ट म्हणून 1 कोटी महिला
  1973 मध्ये माओ शेवटच्या सत्ताकाळात अमेरिकन डिप्लोमॅट हेनरी किसिंजर यांच्याशी औद्योगिक करारावर चर्चा करत होते. किसिंजर गंभीर विषयावर बोलत होते. पण, माओ यांनी ट्रॅक सोडून विचार केला. माओ किसिंजर यांना कथितरीत्या म्हणाले, की चीनकेड औद्योगिक कराराच्या बदल्यात देण्यासाठी महिला वगळता दुसरे काहीच नाही. एवढेच नव्हे, तर एक कोटी महिला अमेरिकेत पाठवण्याचा प्रस्ताव देखील ठेवला. पण, तसे झाले नाही.

 • Absolute Supporters Of The Former Supreme Leader Of China Mao, Some Weird Facts

  टाय खरेदी करणाऱ्यांना अटक
  लेख लियांग हेंग यांनी सांगितल्याप्रमाणे, माओची सत्ता असताना चांगले कपडे घालण्यावर सुद्धा बंदी होती. लियांग यांच्या लहानपणी घरात टाय सापडल्याने त्यांच्या वडिलांना अटक करण्यात आली होती. रेड गार्डच्या सदस्यांनी अटकेची कारवाई करताना त्यांच्या घरातील पुस्तके आणि कपड्यांना आग लावली होती.

 • Absolute Supporters Of The Former Supreme Leader Of China Mao, Some Weird Facts

  रेड सिग्नलवर गाडी थांबवू नये
  लाल रंग कम्युनिस्ट पार्टीचा रंग होता. अशात सरकारने ट्रॅफिक सिग्नलवर लाल रंग दिसल्यास निघून जाणे आणि हिरवा रंग दिसल्यास थांबणे असा नियम केले होता. अन्यथा देशात विकासकामे रखडतील असा सरकारचा युक्तीवाद होता. पक्षातूनच विरोध झाल्याने नंतर हा बंधनकारक नियम संकेतांमध्ये परिवर्तित करण्यात आला. 

 • Absolute Supporters Of The Former Supreme Leader Of China Mao, Some Weird Facts

  शिक्षकांना हाणामारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
  कम्युनिस्ट पक्ष आपल्या सदस्यांना समाजातील जुनाट नियम बदलण्यासाठी प्रोत्साहित करत होते. अशात जुनी सामाजिक तत्वे सांगणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी मारहाण सुरू केली होती. त्यांना सत्ताधाऱ्यांचे समर्थन होते असेही म्हटले जाते. 1966 मध्ये विविध 91 शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांना रस्त्यांवर आणून मारहाण केली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी अशाच घटनांमध्ये 18 शिक्षकांना ठार मारले. तर काही शिक्षकांनी छळाला कंटाळून आत्महत्या केली.

 • Absolute Supporters Of The Former Supreme Leader Of China Mao, Some Weird Facts

  स्टॅम्प गोळा करणे गुन्हा
  माओ यांच्या सरकारमध्ये स्टॅम्प संदर्भात घृणा होती. स्टॅम्प गोळा करण्यावर त्यांनी बंदी लावली. तसेच बंदी झुगारून लावणाऱ्यांना प्रशासनाने अटक सुद्धा केली. स्टॅम्पच्या चाहत्यांनी माओच्या मृत्यूनंतर आप-आपले गोळा केलेले स्टॅम्प लोकांसमोर ठेवले. 

 • Absolute Supporters Of The Former Supreme Leader Of China Mao, Some Weird Facts

  आंब्याची तुलना रताळ्याशी करणाऱ्यास मृत्यूदंड
  चीनच्या लोकांना त्यावेळी आंब्याची माहिती नव्हती. तो नेमका कसा असतो याचीही त्यांना कल्पना नव्हती. अशात एका डेन्टिस्टने जेव्हा पहिल्यांदा आंबा पाहिला तेव्हा त्याची तुलना रताळ्याशी केली. याबद्दल त्या डेन्टिस्टला अटक करून ठार मारण्यात आले. 

Trending