आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या सर्व मशीदींवर राष्ट्रध्वज फडकवा, कायद्याची शिक्षा द्या -इस्लामिक संघटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चायना इस्लामिक असोसिएशनने देशातील प्रत्येक मशीदीवर राष्ट्रध्वज फडकावण्याचा सल्ला दिला आहे. या राष्ट्रीय संघटनेने सर्वच मशीदींमध्ये चीनच्या राज्यघटनेचे शिक्षण देण्याचे सुद्धा आवाहन केले आहे. असे केल्यास मुस्लिमांमध्ये राष्ट्रभक्ती मजबूत होईल असे संघटनेने सांगितले आहे. चायना इस्लामिक असोसिएशन चीनच्या कम्युनिस्ट सरकारच्या अधिपत्याखाली येणारी राष्ट्रीय धार्मिक संघटना आहे. आपण चीनच्या सर्वच मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करतो असा दावा या संघटनेकडून केला जातो.


संघटनेच्या अपीलवर सवाल
- संघटनेने अपील केल्याच्या अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. चीनमध्ये धर्मनिरपेक्षता पाळली जाते. अशात धार्मिक स्थळांवर राष्ट्रध्वज लावल्यास धर्मात राजकारण आणले जाते. हे तर चीनच्या निीतमत्तांचे उल्लंघन आहे असे लोक म्हणाले.
- चीनची राज्यघटना आणि सरकार सुद्धा धर्म आणि राजकारणाला वेगळे ठेवण्याचा दावा करत असतात. पण, देशाचे राष्ट्रध्वज देशाचे प्रतिनिधित्व करतात राजकारणाचे नाही अशा काही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर काहींनी ही संघटना सरकारला खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप लावले आहेत. 


24 तास फडकवा राष्ट्रध्वज
- इस्लामिक असोसिएशनने आपल्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या पत्रानुसार, देशभरातील सर्वच मशीदींमध्ये 24 तास चीनचे राष्ट्रध्वज लावायलाच हवे. तसेच हा झेंडा मशीदींच्या चांगल्या ठिकाणी ठळक दिसेल असे फडकवावे. 
- चीनचे सरकार समर्थक ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, मशीदींमध्ये कायद्यांचे आणि संविधानाचे शिक्षण सुद्धा द्यायला हवे. मशीदींमध्ये अशा काही अॅक्टिव्हिटी आयोजित करायला हव्या जेणेकरून राष्ट्रभक्ती अधिकाधिक वाढेल. 

 

पुढे वाचा, चीनमध्ये मुस्लिमांचे आयुष्य...

 

बातम्या आणखी आहेत...