Home | International | China | Annual Dog Meat Festival Started In China Ignoring All The Criticism

चीनमध्ये सुरू झाले Dog Meat Festival; वाचा वादग्रस्त उत्सवाचा इतिहास

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 21, 2018, 05:03 PM IST

जगभरातून होणाऱ्या टीका आणि मागण्यांवर दुर्लक्ष करून चीनने पुन्हा 21 जूनपासून वार्षिक Dog Meat Festival (कुत्र्यांच्या मा

 • Annual Dog Meat Festival Started In China Ignoring All The Criticism

  बीजिंग - जगभरातून होणाऱ्या टीका आणि मागण्यांवर दुर्लक्ष करून चीनने पुन्हा 21 जूनपासून वार्षिक Dog Meat Festival (कुत्र्यांच्या मांसाचा उत्सव) सुरू केला. युलिन येथे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या वादग्रस्त फेस्टीव्हलमध्ये हजारो श्वानांची कत्तल केली जाते. विविध फूड स्टॉल, हॉटेलांमध्ये या दिवशी मागणी जास्त असल्याने काही दुकानदार चक्क घरांमधून चोरी केलेली कुत्री सुद्धा सर्रास विकतात. गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर होणाऱ्या टीका आणि मोहिमांमुळे यावर्षी श्वानांची संख्या कमी झाल्याचे स्थानिक माध्यम दावा करत आहेत. श्वान आणि मांजरींचे मांस चीनमध्ये लोकांचे आवडता खाद्य आहे.


  अशी झाली सुरुवात...
  - चिनी नागरिकांच्या मते, गेल्या कित्येक शेकडो वर्षांपासून ग्वांक्षी प्रांतात डॉग मीट फेस्टिव्हल साजरा केला जातो. परंतु, त्या उत्सवाचा प्रचार करण्यात आलेला नसल्याने लोकांना आणि खासकरून परदेशांना त्याची माहितीच नव्हती. 30 वर्षांपूर्वी या वादग्रस्त फेस्टिव्हलचा प्रचार सुरू झाला असेही म्हटले जाते.
  - परंतु, अधिकृत रेकॉर्ड पाहिल्यास या वादग्रस्त उत्सवाची सुरुवात 2009 मध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी झाली होती. 2009 मध्ये सुरू झालेल्या या फेस्टिव्हलला युलिन लीचि डॉग मीट फेस्टिव्हल असे नाव देण्यात आले. या उत्सवात लीचि नावाचे छोटेसे फळ सुद्धा खाल्ले जाते. त्यामुळे, फेस्टिव्हलचे असे नाव पडले आहे. जगासमोर या फेस्टिव्हलचे फोटो आले तेव्हा सर्वत्र टीकेची झोड उडाली.


  अमानवीय फेस्टिव्हलचा जगभरातून निषेध
  माणसाचा सच्चा मित्र श्वानाला यात जिवंत उकळले जाते. यात दुकानदार आणि विक्रेते एका चिमट्यामध्ये कुत्र्यांची मान धरतात आणि त्याला जिवंत उकळत्या पाण्यात शिजण्यासाठी ठेवले जाते. त्याच्या किंचाळण्याचा आवाज सुद्धा दुर्लक्षित केला जातो. एवढेच नव्हे, तर काही दुकानदार आणि विक्रेते जिवंत श्वानाचे नरडे तशाच प्रकारे चिमट्यात पकडून त्याला आग लावतात. यासंदर्भातील व्हिडिओ आणि फोटो PETA आणि इतर संघटनांकडून जशास तसे पोस्ट केल्या जातात. जास्तीत-जास्त लोकांनी त्या मुक्या जनावरांच्या वेदना पाहून या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी समोर यावे. फेस्टिव्हलला जाणाऱ्यांचे मन परिवर्तन व्हावे, हा त्या मागचा हेतू असतो.


  पुढील स्लाइड्सवर, आणखी काही फोटो...

 • Annual Dog Meat Festival Started In China Ignoring All The Criticism
 • Annual Dog Meat Festival Started In China Ignoring All The Criticism
 • Annual Dog Meat Festival Started In China Ignoring All The Criticism
 • Annual Dog Meat Festival Started In China Ignoring All The Criticism

Trending