Home | International | China | attention to strengthening China-Sri Lanka relations

चीन-श्रीलंका संबंध दृढ करण्यावर सर्वाधिक लक्ष; शी जिनपिंग यांची पहिल्यांदाच कबुली

वृत्तसंस्था | Update - Feb 05, 2018, 06:24 AM IST

चीनने आक्रमक धोरणा राबवताना श्रीलंकेसोबत जवळीक वाढवल्याची कबुली राष्ट्रप्रमुखांनी दिली आहे. चीन-श्रीलंका संबंध दृढ करण्य

  • attention to strengthening China-Sri Lanka relations

    बीजिंग- चीनने आक्रमक धोरणा राबवताना श्रीलंकेसोबत जवळीक वाढवल्याची कबुली राष्ट्रप्रमुखांनी दिली आहे. चीन-श्रीलंका संबंध दृढ करण्यावर आम्ही सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे, असे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.


    श्रीलंकेसोबतचे सामरिक संबंध वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे सांगून जिनपिंग यांनी रविवारी श्रीलंकेला ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिनपिंग व त्यांचे समकक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्यात या पार्श्वभूमीवर संभाषण झाले. ते पुढे म्हणाले, उभय नेत आणि जनता चांगली मैत्री, परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर देत आहेत. दोन्ही देशांतील सहकार्यामुळे श्रीलंकेला निश्चितपणे चांगली फळे मिळू लागतील. दक्षिण सागरी प्रकल्पाचा लाभ श्रीलंकेला मिळेल, अशी ग्वाही जिनपिंग यांनी दिली. चीनने गेल्या काही वर्षांत श्रीलंकेत ८ अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक विविध प्रकल्पातून करण्यात आली आहे. त्यात हंबानटोटा बंदराचाही समावेश होतो. या प्रकल्पासाठी श्रीलंकेने चीनला एक भूखंड ९९ वर्षांच्या करारावर दिला आहे. तेथे आंतरराष्ट्रीय आर्थिक शहर उभे करण्याचा श्रीलंकेची इच्छा आहे. त्यासाठी चीनने मदत दिली आहे.

    सहकार्याच्या आडून आक्रमक मनसुबे
    चीनने भारतीय उपखंडातील काही देशांना सहकार्य करत असल्याचे सांगून आपले आक्रमक मनसुबे दाखवून दिले आहेत. त्याबद्दल भारताने वारंवार चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेनेही त्याबाबत धोका वर्तवला आहे.

Trending