आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Biggest Futuristic Library At China, The Eye Of Binhai With 1.2 Million Books Facts

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहे चीनचे सर्वात मोठे ग्रंथालय, राज ठाकरेंनीही केले होते कौतुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - राजधानीपासून 100 किमी अंतरावर चीनची सर्वात मोठी आणि अत्याधुनिक लायब्रेरी आहे. या लायब्रेरीत एक दोन हजार नव्हे, तर तब्बल 12 लाख ग्रंथ आणि पुस्तके आहेत. तियानजिन येथे बांधलेले हे ग्रंथालय 34000 चौरस मीटर इतके प्रशस्त आहे. लोक लायब्रेरीच्या रकान्यांजवळच बसून हवे ते पुस्तक वाचू शकतात. 5 मजली असलेल्या या ग्रंथालयाची थीम मानवी डोळ्यावर आधारित आहे. याचे बांधकाम करण्यासाठी 3 वर्षांचा वेळ लागला आहे. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या या ग्रंथालयाला जगातील सर्वात मोठ्या ग्रंथालयांपैकी एक आहे. 

 

राज ठाकरेंनीही केले होते कौतुक
चीनच्या या ग्रंथालयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कौतुक केले होते. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी जगातील सर्वात लायब्रेरींपैकी एकचा उल्लेख केला. सरकार आणि राजकीय पक्षांनी महापुरुषांचे पुतळे उभारण्यापेक्षा अशा प्रकारचे ग्रंथालय उभारावे. येणाऱ्या कित्येक पिढ्यांना त्याचा फायदा होईल असा उल्लेख त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये केला होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या ग्रंथालयाचे आणखी काही फोटो आणि महत्वाचे तथ्य...