आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क - आई वडिलांचा मृत्यू होतो आणि त्यांच्या निधनानंतर चक्क त्यांच्या बाळाचा जन्म होतो. ऐकूण विश्वास बसत नसला तरीही हे वृत्त खरे आहे. ही घटना चीनमध्ये घडली आहे. 2013 मध्ये झालेल्या रस्ते अपघातात एका कपलचा मृत्यू झाला. त्याच कपलच्या बाळाने आता जन्म घेतला आहे. निधनापूर्वी या कपलने आपले भ्रूण सुरक्षित ठेवले होते. आपले बाळ आयव्हीएफ अर्थात सरोगसीच्या माध्यमातून जन्माला यावे अशी त्यांची इच्छा होती.
कपलच्या मृत्यूनंतर आल्या या अडचणी
- दांपत्याचा मृत्यू त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप मोठा धक्का होता. नेहमीच हसत खेळत राहणारे आपला मुलगा आणि सून अचानक कसे जाऊ शकतात असा प्रश्न नेहमीच त्या आईला खुणावत होता. त्याच दरम्यान, या कपलने आपले भ्रूण सुरक्षित ठेवल्याची माहिती त्यांच्या आई-वडील आणि सासू सासऱ्यांना कळाली.
- एक मूल धोरण राहिलेल्या चीनमध्ये कित्येक दांपत्यांना अपत्ये सुद्धा नाहीत. अशात मूल गमावलेल्या आई-वडीलांनी आपला मुलगा आणि सूनेचे भ्रूण चीनच्या नानजिंग हॉस्पिटलमध्ये शोधून काढले.
- भ्रूण -196 अंश सेल्सियस तापमानात सुरक्षित ठेवण्यात आले होते. आजी-आजोबांना ते भ्रूण आपल्या ताब्यात घेण्यासाठी मोठा कायदेशीर संघर्ष करावा लागला. पण, या कुटुंबियांचा लढा येथेच थांबला नाही.
हॉस्पिटलने ठेवली अशी अट
- ज्या हॉस्पिटलने कपलचे भ्रूण सुरक्षित ठेवले होते, त्यांनी ते आजी-आजोबांना परत करण्यासाठी एक अट ठेवली, की दुसरे एखादे रुग्णालय ते असे सांभाळून ठेवणार. पण, कायद्याचे पेचप्रसंग असताना रुग्णालयाने भ्रूण देण्यास नकारही दिला.
- चीनमध्ये सरोगसीवर बंदी आहे. त्यामुळे, चीनच्या बाहेर गर्भधारणेसाठी महिला शोधणे हा एकमेव पर्याय त्या आजी-आजोबांकडे उरला होता.
- कित्येक दिवस शोध घेतल्यानंतर त्यांनी आफ्रिकन देश लाओस येथे एक महिला सापडली. त्या ठिकाणी सरोगसी वैध आहे. पण, तिढा अजुन सुटला नव्हता.
- कायद्यात अडकू नये या भितीने कुठलीही एअरलाइन्स कंपनी त्यांचे भ्रूण लिक्विड नायट्रोजन बाटलीत घेऊन जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे, कारच्या माध्यमातून ते भ्रूण आफ्रिका पर्यंत नेण्यात आले. त्या ठिकाणी महिलेच्या पोटात त्या भ्रूणला ठेवण्यात आले आणि तिने डिसेंबर 2017 मध्ये बाळाला जन्म दिला.
- यानंतर चीनमध्ये त्या मुलाच्या नागरिकत्वाचा प्रश्न उठला. आई टूरिस्ट व्हिसा घेऊन चीनला गेली होती. त्यामुळे, चीन सरकारने त्या मुलास चिनी मानण्यास नकार दिला. शेवटी डीएनए चाचणीनंतर प्रकरण मिटले.
पुढील स्लाइड्सवर, आणखी फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.