Home | International | China | China da Bombardier aircraft stationed for the first time in the Sea of China

चीनने द. चीन सागरात प्रथमच तैनात केलेे बॉम्बवर्षक विमान

वृत्तसंस्था | Update - May 20, 2018, 04:30 AM IST

चीनने दक्षिण चीन सागरात प्रथमच एच-६ के बॉम्बवर्षक विमानांची तैनाती केली असल्याची माहिती चीनच्या हवाई दलाने दिली आहे. हवा

  • China da Bombardier aircraft stationed for the first time in the Sea of China

    बीजिंग- चीनने दक्षिण चीन सागरात प्रथमच एच-६ के बॉम्बवर्षक विमानांची तैनाती केली असल्याची माहिती चीनच्या हवाई दलाने दिली आहे. हवाईदलाने सांगितले की, एच-६ बॉम्बवर्षकासह त्यांच्या अनेक लढाऊ विमानांना आवश्यक सामग्रीसह दक्षिण चीन सागराच्या एका बेटावरून उड्डाण करणे व उतरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हाँगकाँगहून प्रकाशित साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने पीपल्स लिबरेशन एअरफोर्सच्या हवाल्याने सांगितले की, या प्रशिक्षणामुळे हवाई दलाची ताकद वाढली आहे. आता ते या क्षेत्रातील कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास पूर्णपणे सज्ज आहेत.


    अस्थिरता निर्माण होईल : अमेरिका
    चीनने या पावलाचा तीव्र विरोध केला असून यामुळे या क्षेत्रात तणाव व अस्थिरता निर्माण होईल, असे म्हटले आहे. पेंटॅगॉनचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल क्रिस्टोफर लाेगन यांनी यास चीनचा सततचा वादग्रस्त लष्करी कार्यक्रम ठरवले आहे. वॉशिंग्टनमधील स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमध्ये चीनचे संरक्षणतज्ज्ञ बोन्नी ग्लाजर म्हणाले की, दक्षिण चीन सागरात प्रथमच बॉम्बवर्षक तैनात केले
    आहेत. लवकरच एच-६ के बॉम्बवर्षक विमाने बेटावर तैनात केली जातील. यात संशय नाही.

Trending