Home | International | China | China Digging Gold Right Next To Its Disputed Border With India

भारतालगत सीमेवर सोन्याच्या खाणी खोदतोय चीन, अरुणाचल प्रदेशावर ताब्याचा कट

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 22, 2018, 10:54 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याला एक महिनाही पूर्ण झाला नाही, त्यात चीनने पुन्हा आपल्या कुरापती सुरू केल्या आह

 • China Digging Gold Right Next To Its Disputed Border With India

  बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याला एक महिनाही पूर्ण झाला नाही, त्यात चीनने पुन्हा आपल्या कुरापती सुरू केल्या आहेत. भारताशी लागलेल्या सीमेलगत चीनने मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू केले आहे. हाँगकाँगमधून छापल्या जाणाऱ्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चीनला या ठिकामी 4086 अब्ज रुपयांच्या सोने, चांदी आणि इतर मोल्यवान धातूंचा शोध लागला आहे. हा परिसर भारताच्या सीमेला अगदी लागून आहे. विशेष म्हणजे, चीन अरुणाचल प्रदेशच्या मोठ्या भागावर दावा करत आहे. त्यातच आता चीनने अरुणाचल प्रदेश काबिज करण्याचा कट रचला असे सांगितले जात आहे.


  दक्षिण चीन समुद्रासारखा वाद होण्याची भिती
  - साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हा मायनिंग प्रोजेक्ट भारताच्या सीमेला अगदी लागून लहुंजे काउंटीमध्ये आहे. या मायनिंग प्रोजेक्टचा मूळ हेतू तिबेटला लागलेला अरुणाचल प्रदेशचा मोठा भाग काबिज करणे आहे. हाच चीनचा छुपा एजंडा असल्याचे सांगितले जात आहे.
  - नैसर्गिक साधन संपत्तीने भरलेल्या या परिसरात चीन झपाट्याने पायाभूत विकास करू शकतो. त्यामुळे, दक्षिण चीन सागरावर सुरू असलेल्या वादाप्रमाणेच या भागाचा वाद सुद्धा मोठा होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे. दक्षिण चीन समुद्रात भरपूर खनिज संपत्ती असून त्यावर चीन आपला दावा करतो. पण, अमेरिकसह अनेक देश त्यास आंतरराष्ट्रीय सागर म्हणतात.
  - हाँगकाँगच्या दैनिकाप्रमाणे, स्थानिक अधिकारी, चायनीज एक्सपर्ट आणि स्ट्रटेजिक एक्सपर्ट यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चीनने हा प्रोजेक्ट सुरू केला. चीनने ज्या भागात काम सुरू केले तो जगातील सर्वात उंच ठिकाणांपैकी एक आहे. तेथे पोहोचणे कठिण आहे. पण, त्या ठिकाणी टिकून सलग काम करणे खूप कठिण आहे. विशेष म्हणजे, चीनने या परिसरात आधीच रस्त्यांचे बांधकाम केले आहे. जेणेकरून चीनला तेथे जाणे-येणे त्यांच्यासाठी सहज झाले आहे.


  मोदींच्या दौऱ्यानंतरही ही परिस्थिती
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यातच चीनचा अनौपचारिक दौरा केला. या भेटीत कुठलाही एजंडा निर्धारित नव्हता. पीएम मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात अनौपचारिक चर्चाही झाली. ही चर्चा दोन देशांमध्ये नव्हे, तर दोन नेत्यांमध्ये वैयक्तिक संवाद वाढवण्याचा प्रयत्न होता. पण, या भेटीच्या अवघ्या एका महिन्यातच चीनच्या नवीन कुरापती समोर आल्या आहेत.

 • China Digging Gold Right Next To Its Disputed Border With India

Trending