Home | International | China | China Passenger Opens Plane Emergency Door Get Fresh Air

विमान उड्डान घेणार तेवढ्यात प्रवाशाने दार उघडले; म्हणाला, गर्मी होतेय

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 01, 2018, 11:46 AM IST

चीनच्या सिचुआन प्रांतातील विमानतळावर एक अजब घटना घडली आहे.

 • China Passenger Opens Plane Emergency Door Get Fresh Air

  बीजिंग - चीनच्या सिचुआन प्रांतातील विमानतळावर एक अजब घटना घडली आहे. विमान उड्डान घेणारच तेवढ्यात एका व्यक्तीने विमानाचे एमरजेंसी गेट उघडले. चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्याचे नाव चेन असे आहे. हैराण झालेल्या विमानातील स्टाफने त्याला प्रश्न विचारला तेव्हा त्याचे उत्तर आणखी चकित करणारे होते. आपल्याला गर्मी होत असल्याने ताजे वारे हवे होते असे तो म्हणाला. त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  मला वाटले खिडकी आहे - प्रवासी
  वृत्तसंस्थेने चायना मॉर्निंग हेराल्डचा दाखला देत मंगळवारी ही माहिती दिली. हैनान आयलंडवरून परतताना ही घटना घडली आहे. आरोपी प्रवाशाने आपल्याला गर्मी होत असल्याचे सांगत चक्क विमानाचे एमरजेंसी द्वार उघडले. आपल्याला ते विमानाचे दार नाही, तर खिडकी असल्याचे वाटले असे तो म्हणाला. या प्रकरणी चेनला 15 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्याच्या विरोधात जवळपास साडे 7 लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये विमान कंपनीचे नाव जाहीर करण्यात आले नाही.


  यापूर्वीही घडले असे प्रकार
  यापूर्वी एप्रिल 2016 मध्ये शेनझेन विमानतळावर असाच प्रकार घडला होता. 30 वर्षीय बुलडोझर ड्रायव्हर पहिल्यांदाच विमान प्रवास करत होता. त्याने आपातकालीन द्वार उघडले होते. त्याने सुद्धा आपल्याला गर्मी होत असल्याचे कारण दिले होते. या प्रकरणी त्याला 7 दिवसांची कैद आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. आणखी एका प्रकरणात पहिल्यांदा विमान प्रवास करणाऱ्याने आपातकालीन द्वाराच्या कोंड्याला हात टेकण्याची जागा समजून दाबले होते.

 • China Passenger Opens Plane Emergency Door Get Fresh Air

Trending