चीनने पक्ष्यांची 90% / चीनने पक्ष्यांची 90% नक्कल करणारे ड्रोन तयार केले, भारताच्या सीमेवर होऊ शकतो वापर

Jun 27,2018 10:29:00 AM IST

बीजिंग - जगात एकिकडे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर होतो. चीनमध्ये मात्र देशातील नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठीच याचा वापर केला जातोय. सध्या पाच प्रांतामध्ये याचा वापर होतोय. पण एका रिपोर्टनुसार हे ड्रोन असे आहेत, जे अगदी पक्ष्यासारखे दिसतात. विशेष म्हणजे ते अगदी पक्षांच्या उडण्याची 90 टक्के हुबेहूब नक्कल करतात. सध्या शिनजियांग प्रांताच्या उइघर परिसरात हे ड्रोन लावण्यात आले आहेत. येथे चीनची सीमा पाकिस्तान, रशिया आणि भारतासह 8 देशांना जोडलेली आहे. शिनजियांग प्रांतातच भारत आणि चीन दरम्यानचा वादग्रस्त अक्साई चीन प्रांत आहे. या भागातही या ड्रोनचा वापर केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पक्ष्यांची 90% नक्कल
या ड्रोन्सला पंख अशाप्रकारे लावण्यात आले आहे की, सामान्यपणे खरा पक्षी आणि या ड्रोनमधील फरक शोधणे अत्यंत कठीण आहे. जमिनीवरीन पाहिले तर हे ड्रोन पक्ष्यासारखे दिसते. ताशी 40 किमी वेगाने हे ड्रोन उडू शकते. त्यामुळे यावर लवकर शंकाही येत नाही.


रडारच्याही आवाक्याबाहेर
आकार लहान असल्याने हे ड्रोन रडारच्याही आवाक्याबाहेर आहेत. त्यांचे वजन सुमारे 200 ग्रॅम आहे. यात फ्लाइट कंट्रोल सिस्टीम, जीपीएस, आधुनिक कॅमरे आणि सॅटेलाइट डेटा लिंकही देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांवर प्रत्येकवेळी नजर ठेवता येणार आहे. सध्या सर्व देशात याचा वापर करण्यात आलेला नाही. पण आगामी काळात तसे होण्याची शक्यता आहे.

X