आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी कंपनीने कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये वाटले इतके रोकड; पोत्यात भरून नेल्या नोटा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - चीनच्या फांगदा स्पेशल स्टील टेक्नोलॉजीने आपल्या कर्मचाऱ्यांना 163 कोटी रुपयांचा रोकड बोनस म्हणून वाटला आहे. हा सगळाच निधी कर्मचाऱ्यांना नकदी स्वरुपात देण्यात आला. इतकी मोठी रक्कम कर्मचाऱ्यांचे हात आणि खिश्यांमध्ये मावत नव्हती. त्यामुळे, नोकरदार चक्क पोत्यांमध्ये भर-भरून पैसे आपल्या घरी नेताना दिसून आले. या कंपनीच्या स्टील युनिटमध्ये 5 हजार कर्मचारी आहेत. फांगदाची वार्षिक कमाई 82,000 कोटी रुपये आहे. 

 

- कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना 163 कोटी रुपये बोनस दिला. अर्थात सर्वांच्या हातात सरासरी 3.5 लाख रुपये नगदी मिळाले.
- केवळ विद्यमान कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर सेवानिवृत्त झालेल्यांना सुद्धा व्यवस्थापनाने या बोनसचा लाभ दिला आहे. 
- कंपनीचे व्यवस्थापन ट्रकमध्ये पैसे घेऊन आले होते. त्या ट्रकमध्ये लादलेल्या पैश्यांचे वजन तब्बल 2 टन होते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असे पोत्यांमध्ये भर-भरून पैसे घेऊन गेले कर्मचारी....

बातम्या आणखी आहेत...