VIRAL होतोय या / VIRAL होतोय या मुलाचा PHOTO; जगभरातून कौतुकांचा वर्षाव...

VIRAL होतोय या मुलाचा PHOTO; जगभरातून होतोय कौतुकांचा वर्षाव....

Jan 13,2018 02:33:00 PM IST

इंटरनॅशनल डेस्क - चीनच्या एका शाळकरी मुलाचा फोटो सध्या जगभरात व्हायरल होत आहे. शाळेतील वर्गात उभा असलेल्या या मुलाच्या डोक्यावरचे केस, त्याच्या भुव्या आणि चेहऱ्यासह समस्त कपड्यांवर बर्फ साचले आहे. त्याचे असले हाल पाहून चिमुरडे वर्गमित्र त्याच्यावर हसताना दिसून येत आहेत. तो चीनच्या एका ग्रामीण भागात राहतो. परिसरात मायनस 9 डिग्री सेल्सिअस तापमान असताना हा मुलगा आपल्या शाळेत 4 किमींचा पायी प्रवास करून पोहोचला होता. तेव्हा त्याची अवस्था अशी झाली होती...

मातीच्या घरात राहतो...
- 8 वर्षांचा असलेल्या या मुलाचे नाव वांग फुमान असे आहे. त्याचे वडील एका दुसऱ्या गावात मजुरी करतात. तर त्याची आई या जगात नाही.
- हे फोटोज चीनच्या युनान प्रांतातील शाओतोंग शहराचे आहेत. या ठिकाणी उणे 9 अंश सेल्सियस तापमान आहे. अशा वातावरणातही हा मुलगा परीक्षा देण्यासाठी शाळेत पायी पोहोचला होता.
- पीयर व्हिडिओने दिलेल्या माहितीनुसार, लुडियन काउंटीमध्ये एका मातीच्या घरात तो आपल्या आजी आणि बहिणीसोबत राहतो.
- शाळेच्या शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे घर शाळेपासून 4 किमी अंतरावर आहे. वाहतुकीचे साधन परवडत नसल्याने तो पायी चालून शाळेत जातो.
- दररोज 4 किमी पायी चालून येण्यासाठी तो घरातून तासाभरापूर्वी निघतो. मात्र, परीक्षा होती त्या दिवशी तापमानात कमालीची घसरण झाली.
- तरीही तो कुठल्याही प्रकारचे बहाणा न करता शाळेत आला. वर्गात येताच त्याच्या चिमुकल्यांना मित्रांनी त्याची अवस्था पाहून हसू आवरले नाही.
- विशेष म्हणजे, त्याने गणित विषयात तब्बल 99 मार्क मिळवले होते. इतक्या कठिण वातावरणातून शाळेत आल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर शाळेत पोहोचल्याचे समाधान होते.
- सोशल मीडियावर या फोटोतील मुलाचे तोंडभर कौतुक केले जात आहे. लोक त्यांच्या शिक्षणाला असलेल्या डेडिकेशनची दाद देत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या चिमुकल्याचे आणखी काही फोटोज...

X